दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:53 PM2022-07-26T19:53:08+5:302022-07-26T19:53:21+5:30

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली

Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

Next

दौंड : दौंड तालुक्यातील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हलक्या कानाचे कसे झाले असा ही प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.

काही शिक्षक पुढार्‍यांच्या वरदहस्ताने आणि राजकीय शिक्षण संस्था चालकांच्या हट्टापायी एक कार्यक्षम आणि प्रामाणिक कामकाज करणारे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ हे राजकारणाचे बळी पडले असल्याची वस्तूस्थिती आहे. ७ एप्रिल २०२२ रोजी किसन भुजबळ यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अवघ्या ११० दिवसात २६ जुलै २०२२ला त्यांच्या कडील अतिरिक्त पदभार ११० दिवसात काढून घेण्यात आला.  त्यांच्या कारकिर्दीत किसन भुजबळ यांनी बोगस शिक्षण संस्थांना लगाम लावून पाच शिक्षण संस्थांना टाळे ठोकले. तर तीन शिक्षण संस्थांकडून १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यासंदर्भात संबंधित शिक्षण संस्थांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच कामकाजात चुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांना सूचना देखील दिल्या होत्या. 
 
परिणामी अचानक कुठल्याही शाळेला भेटी देणाऱ्या किसन भुजबळ यांचा एक अंकुश दौंड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर बसला होता. यात मात्र कोंडी झाली होती. राजकीय संधान बांधून असलेल्या काही शिक्षक पुढाऱ्यांना तसेच तसेच राजकीय संस्थाचालकांना त्यामुळे किसन भुजबळ यांच्या तक्रारी वाढल्या. आणि एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राजकारणाचा बळी लागल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांत नाराजीचा सूर आहे. दरम्यान गठशिक्षणाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पालक जन आंदोलन करणार असल्याची वस्तुस्थिती आहे. 

Web Title: Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.