व्हिडीओ : सुपरहिराेंची कार प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्ही पाहिलीत का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:33 PM2019-07-03T17:33:28+5:302019-07-03T17:35:24+5:30
हाॅलीवूड सिनेमांमध्ये दिसणारी कार पुण्याच्या झील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे.
पुणे : हाॅलीवूडचे अनेक सुपर हिराेचे सिनेमे आपण पाहिले असतील. या सिनेमांमध्ये सुपरकार्स आपण नेहमीच पाहत असताे. त्यात दाखविण्यात येणाऱ्या कारची वैशिष्ट्ये पाहून आपण आश्चर्यचकित हाेत असताे. अशीच कार आता पुण्याच्या झील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. बॅटमाेबिल टम्बलर असे या कारचे नामकरण केले असून सुपरहिराे बॅटमॅन या चित्रपटातील ही संकल्पना आहे.
बॅटमाेबिल टम्बलर ही कार बॅटमाेबिल मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील क्लिष्ट यंत्रणा (मॅकेनिझम) वापरुन ही बनविण्यात आली असून भारतातील पहिलीच बॅटमाेबिल कार आहे. या कारमध्ये एक्सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इन्व्हर्टेड हब सिस्टिमचा पहिल्यांच उपयाेग करण्यात आला आहे. या कारचा वेग ताशी 120 किलाेमीटर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये वापरण्यात आलेले सस्पेंशन अव्वल दर्जाची आहेत.
या कारबद्दल अधिक माहिती देताना, मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डाॅ. अमाेल उबाळे म्हणाले, ही जगातली पहिली हॅण्डमेड बॅटमाेबिल टम्बलर प्रकारातील कार आहे. इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान वापरुन ही कार तयार केली आहे. व्हिजन सिस्टिम फाॅर व्हेअिकल ही पेटंड सिस्टिम जगात पहिल्यांदाच या कारमध्ये वापरण्यात आली आहे. यात कारच्या चारही बाजूंना कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे कार चालकाला 360 डिग्रीमधले दिसू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हाेणारे अपघात राेखता येणार आहेत.