तीन फुटांचा भाेपळा पाहिलात का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 07:00 PM2019-12-01T19:00:06+5:302019-12-01T19:01:13+5:30
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये तब्बल 3 फुटी दुधी भाेपळ्याची आवक झाली हाेती.
पुणे : गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवार तब्बल ३ फुटी लांब दूधी भोपळ्याची आवक झाली. तीन फुटी लांब अणि तब्बल ३ ते ४ किलो वजन असलेला हा दूधी भोपळा मार्केटयार्डातील व्यापारी, ग्राहकांसाठी आकर्षणाचा विषय झाला हाेता.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळील गुळूंब येथील शेतकरी प्रताप यादव यांच्या शेतातून या भोपळ्याची आवक झाली. रविवारी बाजारात एवूष्ठण दुधी भोपळ्याची सुमारे १० ते २० गाड्या इतकी आवक झाली. त्यात ३ फुटी लांब असलेल्या सुमारे ३ ते ४ किलो वजनाच्या ५० ते ६० किलो दुधी भोपळ्याची आवक झाली. त्यास प्रतिकिलोस १० रुपये भाव मिळाला. तर, लहान आकाराच्या दुधी भोपळ्यास १० ते २० रुपये भाव मिळाला, अशी माहिती तरकारी विभागातील आडते किरण कटके यांनी दिली. दुधी भोपळ्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे समजले जाते. त्यामुळे दुधी भोपळ्याला नेहमी मागणी असते. घरगुती ग्राहकांकडून नेहमीची मागणी असते तर त्यापाठोपाठ हॉटेल व्यावसायिकांकडून त्यास मोठी मागणी असते.