#Mipunekar : विकेंडला वेगळं खायची इच्छा अाहे, मग पुण्यातील हे पदार्थ चाखून पहाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:08 PM2018-03-24T16:08:01+5:302018-03-24T16:38:15+5:30
या विकेंडला बाहेर काही खायचा प्लॅन करत असाल, तर पुण्यातले हे पाच पदार्थ इंडियन अाणि वेस्टन फूडचा अास्वाद तुम्हाला देतील. तर मग यांची चव चाखायला विसरु नका.
पुणे : पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसाच खाद्यसंस्कृतीचाही मोठा वारसा लाभला आहे. मग ती पुण्याची बाकरवडी असो कि मस्तानी. आयटी इंडस्ट्री आणि वाढत चाललेल्या कॉस्मोपॉलिटीयन कल्चरमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि वेस्टन कल्चरचा मेळ घातलेली अनेक हॉटेल्स पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला भारतीय पावभाजी खायची असेल किंवा मग वेस्टर्न ब्राऊनी. तुम्ही पुढील ठिकाणांना एकदा जरुर भेट द्यायला हवी.
कावरे कोल्ड्रींग हाऊस
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड खायची इच्छा होत असते. अशातच पुणेरी मस्तानी मिळाली तर बातच निराळी. पुण्याची सुजाता मस्तानी संगळ्यांना माहितच आहे. परंतु तुम्ही कावरे कोल्ड्रींग हाऊसची मस्तानी सुद्धा एकदा ट्राय करायला हवी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही मस्तानी तुम्हाला स्वर्गानुभूती देऊन जाईल. मस्तानी नको असेल तर तुम्ही मँगो एक्सॉटिका सुद्धा ट्राय करु शकता.
गंधर्वची पावभाजी
पावभाजी हे प्रत्येकाची आवडती डिश असते. विविध ठिकाणी बनविण्याची पद्धतही वेगळी असते. तुमच्या या आवडत्या डिशवर जर तुम्हाला बदाम, काजू असे ड्रायफु्रड्स सजवून दिले असतील तर ? त्याचबरोबर एक्स्ट्रा चिझ मिळालं तर ?, तोंडाला पाणी सुटलं ना... तेव्हा तुम्ही अजून हि पावभाजी ट्राय केली नसेल तर या विकेंडला ट्राय कराच
मसाला पाव
पावभाजी खाऊन कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर गंधर्वच्या मसाला पावचा पर्याय तुमच्यासाठी तयार आहेच. चिज, कोथिंबीर, आणि टामॅटोने गार्निश केलेला हा मसाला पाव नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल.
विमाननगर मधील फलाहारचं पहाडी पनीर ग्रिल्ड सॅण्डविच
पहाडी पनीर ग्रिल्ड सॅण्डविच या नावामुळेच सॅण्डविचबद्दल कुतुहल निर्माण होतं. तेच तेच व्हेज सॅण्डविच खाऊन कंटाळा आला असेल तर हे सॅण्डविच तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करेल. ब्रेडमध्ये भरलेलं पनीर आणि सोबत असलेल्या दोन प्रकारच्या चटण्या तुमचं मन तृप्त करेल.
फॅण्टसी ब्लॅक हॉल
कॅफे पिडरडोनट्स चे फॅण्टसी ब्लॅक हॉल हा तुम्हाला वेस्टन खाद्याची अनुभूती देऊन जाईल. संध्याकाळच्या वेळेला शांत बसून एखाद्याशी गप्पा मारायच्या असेल तर तुम्हाला या पदार्थाची चांगली साथ होईल. सोबत तुम्ही येथील चॉकलेट वॉलनट ब्राऊनीचा सुद्धा आनंद घेऊ शकता.