हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: हमाल मापाडी मतदारसंघात संतोष नांगरेंचा विजय
By अजित घस्ते | Published: April 29, 2023 12:40 PM2023-04-29T12:40:31+5:302023-04-29T12:41:23+5:30
महर्षी नगर शिव शंकर सभागृहात मतमोजणी सुरू...
पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या १८ जागेसाठीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळ पासून महर्षी नगर शिव शंकर सभागृहात सुरू आहे. यामध्ये हमाल मापाडी मतदार संघाचा पहिला निकाल जाहीर झाला असून संतोष नांगरे यांच्या विजय झाला आहे.
संतोष नांगरेंना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली.
या मतदार संघात एका जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९%) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. त्यामुळे हमाल मापाडी मतदार संघात नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
त्याचबरोबर व्यापारी-आडते गटातून दोन जागेसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये गणेश घुले व बापू भोसले हे आघाडीवर असून इतर मतमोजणी सुरू आहे.