पुणे: एकीशी शरीरसंबंध अन् दुसरीशी केला विवाह; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: August 4, 2022 07:09 PM2022-08-04T19:09:43+5:302022-08-04T19:10:50+5:30
शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर...
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर त्याने दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केले. ही बाब समजल्यावर पीडित तरुणीने संबंधिताला जाब विचारताच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हडपसर येथील पीडित ३० वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल शिवानंद भगत (रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते मे २०२० दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, राहुल भगत याने फिर्यादीशी ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केले. याबाबत कळताच फिर्यादीने जाब विचारला. तेव्हा शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.