हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:39 AM2018-12-06T01:39:00+5:302018-12-06T01:39:07+5:30

कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथील शेतक-याने कांदा फुकट वाटला.

The hawala farmer felt free onion | हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा

हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा

Next

बारामती : कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथील शेतक-याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाºयांनी स्वेच्छेने दानपेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठविण्यात येणार आहेत. असा फलक याठिकाणी लावून या शेतकºयांने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध केला आहे.
बारामती नगरपालिकेसमोर जैनकवाडी येथील तरुण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयश व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला. दिनेश काळे म्हणाले की, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये मी कांद्याची लागवड केली. दीड एकरात १५० बॅग कांदा झाला. त्यापैकी १२० बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ १२ हजार रुपयांमध्ये विक्री केली.
कांद्यासाठी एकरी ४५ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ १२ हजार रुपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहे. शासनाला शेतकºयाची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, असे काळे यांनी सांगितले.
>नागरिकांनी दिला आंदोलनाला पाठींबा
काळे यांनी लावलेल्या फलकावर ‘शेतकरी बांधवांना मागील ४ वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावर खुश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन’ असा उपरोधिक मजकूर देखील लिहिला आहे. त्यांच्या सोबत आठवीत शिकणारा मोठा मुलगा श्रेयश व सहावीत शिकणारा लहान मुलगा प्रसाददेखील शाळा बुडवून वडिलांना मदत करत होते.काही नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

Web Title: The hawala farmer felt free onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.