हंजरला पालिकाच ठोकणार टाळे

By admin | Published: November 30, 2014 12:28 AM2014-11-30T00:28:35+5:302014-11-30T00:28:35+5:30

उरुळी देवाची येथील शहरातील कच:यावर प्रक्रिया करणा:या हंजर प्रकल्पाला टाळे ठोकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

The hazer will not let the ball roll | हंजरला पालिकाच ठोकणार टाळे

हंजरला पालिकाच ठोकणार टाळे

Next
पुणो : उरुळी देवाची येथील शहरातील कच:यावर प्रक्रिया करणा:या  हंजर प्रकल्पाला टाळे ठोकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी, तसेच वीजपुरवठय़ासाठी लाखो रुपये भरूनही या प्रकल्पात अवघा 1क्क् ते 2क्क् टन कचराच प्रक्रिया केला जात असल्याने प्रशासनाकडून हंजर प्रकल्पाशी करण्यात आलेला करार रद्द करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुकारलेल्या कचरा बंद आंदोलनास अवघा एक महिना उरलेला असताना, हा प्रकल्पही बंद पडला असल्याने शहरातील कचरा प्रक्रियाच जवळपास ठप्प होणार आहे. सध्या शहरात दररोज सुमारे 15क्क् ते 16क्क् टन निर्माण होतो. तर, याचाच एक भाग म्हणून वीजबिल थकल्याने बंद असलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेने गेल्या पाच दिवसांपासून पैसे देण्यासही टाळाटाळ सुरू केली आहे.
शहरातील कच:यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 2क् एकर जागेत सुमारे 2क्क् टन क्षमतेचा हा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता. याच ठिकाणी सेल्को या कंपनीचाही सुमारे 5क्क् टन क्षमतेचा प्रकल्प उभारलेला होता. पुढे न्यायालयाने सेल्को प्रकल्प हंजरकडे दिला. तसेच हंजरची क्षमताही  3क्क् टनांनी वाढविण्यात आली होती. ंत्यामुळे या प्रकल्पात 2क्11 नंतर दररोज सुमारे 1क्क्क् टन कच:यावर प्रक्रिया केली जात होती. त्यानंतर या  वर्षीच्या सुरुवातीस या प्रकल्पाच्या काही भागास  आग लागली, त्यामुळे प्रकल्पाची क्षमता 35क् टनांवरच आली होती. या घटनेनंतर महापालिकेने हंजरला क्षमता वाढविण्यासाठी सहा महिन्यांची मुदतही दिली होती. तसेच, मनुष्यबळ आणि आर्थिक मदतही देण्यात आली होती. मात्र, अद्यापर्पयत प्रकल्प  व्यवस्थापनास 3क्क् टनांच्या वर हा प्रकल्प चालविता आलेला नाही. तसेच वारंवार वीजबिल थकल्याने तीन वेळा प्रकल्पाची वीजही महावितरणने तोडली आहे. गेल्या सहा महिन्यांत पालिकेने या विजबिलापोटी जवळपास 66 लाख 72 हजार रुपयांचे बिल भरलेले आहे. तर, पाच दिवसांपूर्वी 27 लाखांची थकबाकी असल्याने पुन्हा वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प ठप्प आहे. दरम्यान, हंजर प्रकल्प बंद पडल्यास पुण्यातील कचराकोंडी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत 
आहे. (प्रतिनिधी)
 
शहरात सध्या प्रक्रिया होणारा कचरा 
प्रकल्पक्षमता प्रत्यक्षात प्रक्रिया 
हंजर                          1 हजार टनक्
दिशा वेस्ट                    1क्क् टन              8क् 
अजिंक्य बायोफर्ट           2क्क् टन              15क् ते 18क् टन
रोकेम                          75क्15क्
बायोगँस                        1क्क्                   65

 

Web Title: The hazer will not let the ball roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.