त्यांनी मरणालाही दिली हुलकावणी

By Admin | Published: December 10, 2014 12:16 AM2014-12-10T00:16:03+5:302014-12-10T00:16:03+5:30

दुस:याच्या चुकीमुळे ओढावलेल्या अपघातामुळे चिंचवड येथे सोमवारी रात्री खडी सिमेंट मिक्सर पलटला. वाहनाच्या केबीनचा पुरता चुराडा झाला.

He also gave death to death | त्यांनी मरणालाही दिली हुलकावणी

त्यांनी मरणालाही दिली हुलकावणी

googlenewsNext
पिंपरी : दुस:याच्या चुकीमुळे ओढावलेल्या अपघातामुळे चिंचवड येथे सोमवारी रात्री खडी सिमेंट मिक्सर पलटला. वाहनाच्या केबीनचा पुरता चुराडा झाला. यातून कोणी वाचेल, अशी सुतराम शक्यता नसताना त्यामधील दोघेजण सहीसलामत बाहेर पडले. आमचा पुनर्जन्मच झाल्याची भावना मरणाच्या दारातून बचावलेल्या इब्राहिम मुल्ला यांनी व्यक्त केली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रय}ात झालेल्या या अपघातील वाहनचालक रामकृष्ण तरल (वय 35, रा. भुजबळ मळा, पुनावळे, मुळगाव औरंगाबाद) हा सुखरुप असून जखमी अभियंता प्रमोद सिंग (वय 32, रा. केएसबी चौकाजवळ, चिंचवड. मुळगाव बिहार) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामध्ये डंपरच्या केबीनचा चुराडा झाला. स्टेअरिंग पूर्णत: चालकाच्या खूर्चीर्पयत खेटले. ज्याच्यामुळे अपघात घडला तो दुचाकीचालक येथून पसार झाला. वाहनातील कोणी बचावण्याची परिस्थिती नसताना व मदतीला कोणी नव्हते. वाहनचालक किरकोळ जखमी झाले. सहकारी इब्राहिम हे दोघेही बाहेर आले. फरपटत बाहेर आल्याने पदपथावर त्यांच्या रक्ताचा सडा पडला असताना जखमी होऊन बेशुद्धावस्थेतील अभियंता सिंग यांच्या मदतीसाठी ते प्रय} करू लागले. रहिवाशी वाहनचालकांनीही मदत करून तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर इब्राहिम यांना घरी सोडले. तर सिंग यांना दुस:या खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
 
4चिंचवडच्या वाल्हेकर वाडीकडून जुन्या जकात नाक्याच्या कै. शंकरलालजी  जोगीदासजी मुथा रस्त्याच्या वळणावर सोमवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला. जयकुमार इंन्फ्रास्टर प्रा. लि. या कंपनीचे केएसबी चौकात उड्डाणपुल बांधण्याचे कंत्रट सुरू आहे. त्यासाठी खडी व सिमेंटचे मिश्रण घेवून पुनावळच्या भुजबळ मळा येथील प्रकल्पावरून वाहन (एम.एच. क्4 जी. जे. 1162) घेवून चालक रामकृष्ण हे वाल्हेकरवाडीमार्गे केएसबी चौकाकडे निघाले. 
 
4या वेळी त्यांच्यासह सहकारी इब्राहिम मुल्ला (वय 19, रा. भुजबळ मळा, पुनावळे, मुळगाव पश्चिम बंगाल) आणि कंपनीचे बांधकाम अभियंता प्रमोद सिंग हे होते. जुन्या जकात नाक्याजवळ आले असता चौकात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पुलावरून जाण्यासाठी रामकृष्ण यांनी मुथा मार्गाने वाहन उजविकडे वळविले.
 
 4याचवेळी एक दूचाकीचालक थेरगावकडून मुथा रस्त्याने वेगाने चौकात येत असल्याचे रामकृष्ण यांनी पाहिले. दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रय}ात त्यांनी आपले वाहन आणखी डाविकडे घेतले. दुचाकी चालक बचावला, मात्र या प्रय}ात खडी मिक्सर पदपथावर आदळून पलटला. 

 

Web Title: He also gave death to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.