तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 15:32 IST2023-06-08T15:30:10+5:302023-06-08T15:32:39+5:30
कुत्रा घरामध्ये बंद असल्यामुळे बिबट्याला कुत्र्याची शिकार करता आली नाही, परंतु त्या ठिकाणी असणारी चप्पल मात्र बिबट्या घेऊन गेला

तो दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलचं घेऊन गेला; पाहा बिबट्याचा व्हिडिओ
निरगुडसर: दबक्या पावलांनी आला आणि शिकार न करता बिबट्या चक्क चप्पल चोर निघाला. ही घटना आहे- निरगुडसर तालुका आंबेगाव येथील माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांच्या बंगल्यामधील.
पहाटेच्या वेळी आलेला हा बिबट्या सी.सी.टि.व्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया मध्ये फिरत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांचा निरगुडसर पिंपळगाव रस्त्यावर बंगला आहे. बंगल्याच्या आजूबाजूला उसाचे क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. पहाटेच्या सुमारास एक बिबट्या बंगल्याच्या आवारामध्ये घुटमळताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वळसे पाटील यांचा कुत्रा घरामध्ये बंद असल्यामुळे बिबट्याला कुत्र्याची शिकार करता आली नाही, परंतु त्या ठिकाणी असणारी चप्पल मात्र बिबट्या घेऊन गेला. त्यामुळे सोशल मीडियावर बिबट्या बाबत दबक्या पावलांनी आला आणि चप्पल घेऊन गेला अशी चर्चा आहे.मात्र ग्रामस्थांनी भीती व्यक्त करत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
बिबट्या दबक्या पावलांनी आला अन् शिकार न करता चक्क चप्पलच घेऊन गेला #Pune#leopardpic.twitter.com/JeeI0vkUOv
— Lokmat (@lokmat) June 8, 2023