पैजेसाठी कायपण..! अवघ्या नऊ मिनिटांत '' त्याने '' संपवला तब्बल ४५ कप चहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:23 PM2019-09-16T15:23:14+5:302019-09-16T15:28:42+5:30
१ हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने चक्क किटलीतील ४५ कप चहा पिऊन टाकला.
बारामती : पैज शब्दातच आव्हान आहे. अनेकजण हा पैजेचा विडा उचलण्यासाठी जीवावर उदार होतात,बेभान होतात. इंदापुर तालुक्यातील भिगवण येथील मित्रांमध्ये लागलेली पैज सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. यामध्ये मित्रांनी लावलेली १ हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने चक्क किटलीतील ४५ कप चहा ९ मिनिटात पिऊन टाकला. किटलीभर चहा पितानाचा या युवकाच्या व्हिडीओने सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे.
सचिन सोपान शिंदे (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे.सचिन हा भिगवण स्टेशन (ता. इंदापुर) येथील राहीवाशी आहे.त्याची स्वताची प्रवाशी वाहुतक करणारी रीक्षा आहे.भिगवण खडकि मार्गावर तो प्रवाशी वाहतुक करतो. शनिवारी(दि १४) दुपारी ३ च्या दरम्यान रीक्षा थांब्यावर सर्व मित्रांमध्ये गप्पा रंगल्या.यावेळी गप्पा मारताना किटलीभर चहा संपविण्याची पैज लागली.रवि कोळेकर यांच्यासह युवराज खटके,दिनेश अनभुले,किरण कांबळे आदी मित्रांनी हि पैज लावली. यावेळी किटलीभर चहा पिऊन संपविण्याचा आत्मविश्वास असणाऱ्या सचिनने हा पैजेचा विडा उचलला. केवळ पैजेचा विडा उचलुन न थांबता सर्वांनी येथील प्रसिध्द चहाचा स्टॉल गाठला. किटलीभर असणारा ४५ कप चहा पराथीमध्ये ओतला.याच पराथीतुन सचिनने घोटाघोटाने नऊ मिनिटात संपुर्ण चहा घशाखाली उतरविला. संपुर्ण चहा प्यायल्यानंतर सुरवातीला सचिनला मळमळ होण्याचा थोडा त्रास जाणवला.मात्र, पैज जिंकल्याच्या आनंदापुढे हा त्रास त्याला जाणवला नसल्याचे तो सांगतो. पैज किती रुपयांची याचे मला महत्व नाहि.मात्र, मित्रांमध्ये एक वेगळे अनामिक नाते असते.त्याच नात्यातुन मित्र गमतीजमती करतात.त्यामुळे जीवनातील ताण नाहिसा होतो.मित्र महत्वाचेच असतात.त्यांनी लावलेली पैज जिंकण्याचा विश्वास मी सार्थ ठरविला,याचे मला समाधान असल्याचे सचिन शिंदे याने ' लोकमत ' शी बोलताना सांगितले.पैज पूर्ण केल्यानंतर मित्रांनी पैजेच्या पैशासह चहाचे बिल लगेच ' पेड' केले.मात्र, ही पैज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.