धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:58 PM2018-12-10T13:58:51+5:302018-12-10T14:10:43+5:30

तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले

He got gold stolen, but she took case back after 37 years | धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

Next
ठळक मुद्देलोकअदालतीत असाही न्याय : महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरी

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फियार्दी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला. प्रवासादरम्यान ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेत हा दावा निकाली काढण्यात आला. शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई ज्ञानोबा सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या  १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणा-या त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात कर्नल हायस्कूलसमोर असलेल्या पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासा दरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ््याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. मात्र गाडीत गर्दी व हातात बॅग असल्याने त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ््यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरीत संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. चोरट्यांना एक महिलेने पकडले म्हणून बसमधील इतर प्रवाशी त्यावेळी अवाक झाले होते. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.
        फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्वे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्यांचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हा गुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रविंद्र कांबळे यांनी प्रयत्न केले. 
समन्समुळे मुलाने बोलणे सोडले. गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फियार्दींवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फियार्दीबरोबर बोलणेच सोडून दिले होती, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबात भिती असल्याचे पुढे येते, असल्याचे कोळी म्हणाले. 

Web Title: He got gold stolen, but she took case back after 37 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.