कामाला आला, वाहनचोर झाला

By admin | Published: November 14, 2014 11:58 PM2014-11-14T23:58:17+5:302014-11-14T23:58:17+5:30

पोटासाठी पुण्यात आलेल्या तरुणाने झटपट पैसे मिळवण्यासाठी चक्क फावल्या वेळेत वाहनचोरी करण्याचा पेशा स्वीकारला.

He got to work, became a vendor | कामाला आला, वाहनचोर झाला

कामाला आला, वाहनचोर झाला

Next
पुणो : पोटासाठी पुण्यात आलेल्या तरुणाने झटपट पैसे मिळवण्यासाठी चक्क फावल्या वेळेत वाहनचोरी करण्याचा पेशा स्वीकारला. नव्यानेच वाहनचोरीला सुरुवात केलेल्या या तरुणाला पोलिसांपासून स्वत:ला वाचवण्याचे कसब अवगत नसल्यामुळे त्याला शुक्रवारी पोलिसांच्या चाणाक्ष नजरांनी हेरले. चोरीच्या मोटारसायकलीवर असलेल्या नंबरप्लेटने त्याचे बिंग फोडले आणि तो गजाआड गेला.
सागर वसंत सोमवंशी (वय 24, रा. हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. सोमवंशी हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमधील किलज गावचा रहिवासी आहे. प्लंबिंगची कामे करून पोट भरण्यासाठी तो 1 नोव्हेंबर रोजी पुण्यात आला होता. तेव्हापासून तो हिंजवडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहे. तुळजापुरहून येताना त्याने तेथील एका डॉक्टरचीच मोटारसायकल चोरुन आणली होती. या गाडीची मूळ नंबरप्लेट बदलून त्याने पुणो आरटीओचा क्रमांक असलेली नंबरप्लेट लावली. शुक्रवारी दुपारी तो शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आला होता. नेमके त्याच वेळी गस्तीवरील पोलीस कर्मचारी अमेय रसाळ यांची चाणाक्ष नजर त्याच्या नंबरप्लेटवर पडली. 
सोमवंशीकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेथून निसटण्याच्या तयारीत असलेल्या सोमवंशीला सहायक फौजदार कैलास मोहोळ, सिद्दीकी, साबळे, हजारे, जाधव, महाडीक आणि प्रशांत गायकवाड या सर्वानी जागेवरच पकडले. सध्या वापरत असलेली मोटारसायकल तुळजापूरहून चोरल्याचे त्याने सांगितले. त्याने शिवाजीनगर भागातून आणखी दोन दुचाकी चोरलेल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तीनही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे, शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)
 
नंबरप्लेटवरील क्रमांकाच्या मालिकेची अक्षरे ही खूपच जुन्या मालिकेची असल्याचे पोलिसांच्या  लक्षात आले. त्यांनी सोमवंशीला थांबवून चौकशी केली; मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. निसटण्याच्या तयारीत असलेल्या सोमवंशीला जागेवरच पकडले. मोटारसायकल स्वत:ची असल्याचे सांगणारा सोमवंशी पोलिसी खाक्या दाखवताच कबूल झाला. 

 

Web Title: He got to work, became a vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.