स्वत:च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करीत होता बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:18+5:302021-09-15T04:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याच अल्पवयीन मुलीवर तो गेल्या ७ वर्षांपासून बलात्कार करीत होता. वडीलच नराधम निघाल्याने बुजलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्याच अल्पवयीन मुलीवर तो गेल्या ७ वर्षांपासून बलात्कार करीत होता. वडीलच नराधम निघाल्याने बुजलेल्या या १३ वर्षांच्या मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती आपल्या शाळेतील शिक्षिकांना दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
कोंढवा पोलिसांनी या किराणा दुकानदार वडिलांना अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. तो गेली ७ वर्षे आपल्याच मुलीवर अत्याचार करीत होता. सध्या शाळा बंद असल्याने मुलगी घरीच असते. आपल्यावरील हा अत्याचार ही मुलगी असह्यपणे सहन करीत होती. शेवटी तिने आपल्या ऑनलाइन शिकविणाऱ्या शाळेच्या शिक्षिकेला आपबिती कहाणी सांगितली. त्यांनी याकडे गंभीरपणे पाहत थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठले. कोंढवा पोलिसांनी तातडीने या शिक्षिकेची फिर्याद घेतली. त्यावरून पोलिसांनी ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून मुलीच्या वडिलांना अटक केली.