विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:08 AM2021-04-17T04:08:55+5:302021-04-17T04:08:55+5:30
बारामती : विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचा गर्भपात केल्याची तक्रार एका युवतीने बारामती शहर ...
बारामती : विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचा गर्भपात केल्याची तक्रार एका युवतीने बारामती शहर पोलिसात केली आहे. त्यानुसार वैभव अनंत देशमुख (रा. शिवनगर, तांदूळवाडी रोड, बारामती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती २३ वर्षीय युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. ही युवती खासगी कंपनीत नोकरी करते. शहरातील महाविद्यालयात ती शिक्षण घेत असताना २०१७ साली तिची वैभव याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेतला होता. त्याने डिसेंबर २०१८ मध्ये पाटस रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ तिला भेटण्यास बोलावले. तेथे तो बुलेटवर आल्यानंतर त्याने तिला फिरायला चल, अशी मागणी केली. युवतीने नकार दिला असता चिडून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी त्याने उंडवडी बाजूला तिला फिरायला नेत त्याच्याशी जवळीक साधली. १० मार्च २०२० रोजी त्याने तिला फोन करत घरी एकटा आहे, तू मला भेटायला ये अशी मागणी केली. फिर्यादीने त्याला नकार दिला असता त्याने मी तुझ्या घरी येतो, मग बघू तू कशी येत नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून युवती त्याच्या घरी गेली. त्या दिवशी त्याने तिला मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान त्यानंतर काही दिवसांनी गर्भवती असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. तिने वैभव याला ही बाब सांगितली असता त्याने गोळ्या आणून देत तिचा गर्भ खाली करण्यास भाग पाडले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये त्याने फिर्यादीला भिगवण रस्त्यावरील एका लॉजवर तसेच भिगवणमधील एका लॉजवर नेत तिच्याशी शरीर संबंध ठेवले. १२ फेब्रुवारी रोजी युवतीने त्याच्या घरी जात त्याच्या कुटुंबाला दोघांतील संबंधाबाबत कल्पना दिली. त्यावेळी २८ फेब्रुवारी रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याचे ठरले. २८ रोजी तिने वैभव याला फोन केला. त्यावेळी त्याने तिला जबरदस्तीने बुलेटवर बसवत एमआयडीसीतील एका कंपनीत नेत तिच्याशी जबरीने संबंध ठेवले. जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. घाबरलेल्या फिर्यादीने अखेर तिच्या मामाला या घटनेबद्दल कल्पना दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
————————————————