सहा वर्षांनंतर ताे भेटला कुटुंबियांना ; भावाला शाेधायला पडला हाेता बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:24 PM2019-05-31T19:24:50+5:302019-05-31T19:35:15+5:30
सहा वर्षापूर्वी भावाच्या शाेधात निघालेला 10 वर्षाचा मुलगा चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि पुण्यात येऊन पाेहचला. साथी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर त्याच्या कुटुंबियांना शाेधण्यात यश आले.
पुणे : सहा वर्षांपूर्वी लुधियानामधून भावाला शाेधण्यासाठी बाहेर पडलेला अवघ्या 10 वर्षाचा चंदन चुकीच्या ट्रेनमध्ये चढला आणि थेट पुण्यात येऊन पाेहचला. एक मुलगा हरवल्याच्या दुःखाच कुटुंबट असतानाच दुसरा मुलगा देखील हरवला. पुण्यात साथी संस्थेला चंदन सापडला. त्याला बालगृहात ठेवण्यात आले. साथी संस्थेच्या प्रयत्नांमुळे सहा वर्षांनंतर चंदनच्या आई वडीलांचा शाेध घेण्यात आला. गुरुवारी चंदनचे पालक त्याला घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले.
11 फेब्रुवारी 2013 राेजी चंदनचा भाऊ राजू हा आठ वर्षाचा असताना लुधियानामधून हरवला. त्यावेळी चंदन हा अवघ्या 10 वर्षाचा हाेता. त्याच्या वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार पाेलिसांकडे केली. त्यावेळी चंदन देखील त्याच्या भावाचा शाेध घेत हाेता. शाेध घेत असताना चंदन पुण्याला येणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. पुण्यात आल्यानंतर साथी संस्थेने त्याच्याशी संपर्क केला. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर ताे त्याचे काेलकात्याला घर आहे इतकेच सांगत हाेता. त्यानंतर त्याला शिवाजीनगर येथील बालगृहात ठेवण्याचे आदेश बाल कल्याण समितीने दिले. तेथे चंदन तीन वर्ष हाेता.
काही कारणात्सव 2017 शिवाजीनगर येथील बालसुधारगृह बंद करण्यात आले. त्यानंतर चंदनची रवानगी मंचर येथील आदिवासी ग्रामीण प्रतिष्ठन संस्था येथे करण्यात आली. तेथे ताे शाळा देखील शिकत हाेता. तेथील काही मुलांसाेबत झालेल्या भांडणामुळे ताे जानेवारी 2019 ला तेथून पळून गेला. तेथून ताे बंगळूर ला पाेहचला. तेथील पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याला बंगळूर येथील सुधारगृहात ठेवण्यात आले. तेथे ताे सहा महिने हाेता. त्यानंतर त्याला पुन्हा मंचर येथील सुधारगृहात आणण्यात आले. पुन्हा काही मुलांसाेबत झालेल्या भांडणातून ताे आणखी दाेन मुलांना घेऊन मंचरच्या सुधारगृहातून पळून गेला. दाेन दिवस चालत त्याने पुणे स्टेशन गाठले. 7 मेला साथी संस्थेला ताे पुन्हा भेटला. त्याला बाल कल्याण समितीसाेर हजर केले असता त्याला साथी संस्थेकडेच ठेवून त्याच्या आई वडिलांचा शाेध घेण्यास सांगण्यात आले.
साथी संस्थेने अथक परिश्रमातून त्याच्या घरच्यांना शाेधून काढले. गुरुवारी त्याचे पालक त्याला घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले. आपल्या मुलाला सहा वर्षांनंतर पाहून घरच्यांचे डाेळे आनंद अश्रूंनी भरुन गेले हाेते.