महिलेला सिंगापूरला जॉब लावून देतो असे सांगून उकळले तब्ब्ल अकरा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:46 PM2021-04-19T18:46:34+5:302021-04-19T18:46:56+5:30

खासगी कॉल सेंटरमध्ये झाली ओळख

He said that he would give a job to a woman in Singapore | महिलेला सिंगापूरला जॉब लावून देतो असे सांगून उकळले तब्ब्ल अकरा लाख

महिलेला सिंगापूरला जॉब लावून देतो असे सांगून उकळले तब्ब्ल अकरा लाख

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवले, त्यानंतर लैंगिक अत्याचारही केला

पिंपरी: खासगी कॉल सेंटरमध्ये काम करत असताना महिलेशी ओळख केली. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जॉब साठी नर्सिंग कोर्स करिता क्रेडिट व डेबिट कार्ड वापरून खरेदी करून ११ लाख रुपयांची फसवणूक केली. पुणे येथे २० नोव्हेंबर २०१७ ते २३ डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. 

पीडित ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी  फिर्याद दिली आहे. रोनित डी कपूर उर्फ संदीप दादाराव वायभिसे (वय ३४, रा. वडगाव शेरी, पुणे), असे आरोपीचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महिला आणि वायभिसे हे दोघेही कॉल सेंटरच्या एका खासगी बीपीओ कंपनीत नोकरीला असताना त्यांची ओळख झाली. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, सिंगापूर येथे जॉब करिता, नर्सिंग कोर्स करिता आरोपीने फिर्यादीचे क्रेडिट व डेबिट कार्ड वापरले. तसेच अनेक गोष्टींची खरेदी केली. लग्नाचे आमिष देऊन फिर्यादीची ११ लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेला सर्व घटना कळल्यावर महिलेने पैसे मागितले असता  पैसे परत देणार नाही, अशी धमकी देऊन आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले.

Web Title: He said that he would give a job to a woman in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.