'तू मुझे बहोत पसंद हो' म्हणाला अन् चार्जशीट दाखल होताच तुरुंगात गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:48 PM2021-12-14T19:48:08+5:302021-12-14T19:48:29+5:30

गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांत पोलिसांनी तरुणाच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले

He said I like you very much and went to jail as soon as the charge sheet was filed | 'तू मुझे बहोत पसंद हो' म्हणाला अन् चार्जशीट दाखल होताच तुरुंगात गेला

'तू मुझे बहोत पसंद हो' म्हणाला अन् चार्जशीट दाखल होताच तुरुंगात गेला

Next

पिंपरी : एक तरुण महिलेच्या घरात घुसला. तू मुझे बहोत पसंद हो, मेरी हो जाओ, असे म्हणून गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांत पोलिसांनी तरुणाच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने ४८ तासात आरोपीला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली.

सुरेशकुमार मोहनलाल (वय २२, रा. वेताळनगर, चिंचवड, मूळ रा. जम्मू काश्मीर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारी पक्षातर्फे साधना बोरकर यांनी युक्तिवाद केला. पीडित महिला १० डिसेंबर रोजी घरात असताना आरोपी तिच्या घरात गेला. तू मुझे बहोत पसंद हो, मेरी हो जाओ, असे म्हणून त्याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने फिर्याद दिल्यानुसार चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २४ तासांत आरोपीच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दोषारोपपत्र सादर केले. महिला विनयभंग व अत्याचार विषयक गुन्ह्यांचे न्यायालयीन कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी या गुन्ह्याचे कामकाज जलदगतीने करण्यात आले. आरोपीवरील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने ३६ तासांत सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक किशोर पाटील, उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस नाईक सचिन सोनपेटे, कोर्ट कर्मचारी पोलीस हवालदार सुरेश केदारी यांनी ही कामगिरी केली.

Web Title: He said I like you very much and went to jail as soon as the charge sheet was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.