पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 08:36 PM2022-10-20T20:36:46+5:302022-10-20T20:39:26+5:30

पुरातून पोहून बाहेर निघत तो रांजणगाव गाठत बायकोला भेटला....

He swam out of the flood and has met his wife pune latest news | पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!

पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!

googlenewsNext

- महेश जगताप

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील मुर्टी - मोरगाव रस्त्यावर सानिका हाॅटेल येथे मुर्टी गावच्या हद्दीतील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आल्यामुळे बुधवारी रात्री बारा वाजता एक दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. मात्र, पुरातून पोहून बाहेर निघत तो रांजणगाव गाठत बायकोला भेटला.

सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील तरुण सागर अरविंद पाटील (वय २९) हा कऱ्हाडवरून सातारा, नीरा, मोरगावमार्गे रांजणगाव येथे कामाला असणाऱ्या प्रिया सागर पाटील यांना दिवाळीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी जात असताना मोरगाव - मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्तीशेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला होता. याच दरम्यान सागर पाटील हा दुचाकी या पाण्यातून घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने ‘पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आतमध्ये जाऊ नकोस’, असे सांगितले. मात्र, सागर पाटील हे न ऐकता पुढे गेला असता, हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिली.

या घटनेची माहिती समजताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील गावातील तरुणांच्या मदतीने या दुचाकीचा व वाहून गेलेल्या सागर पाटीलचा शोध सुरू केला. एका झाडाला अडकलेली त्याची गाडी सापडली, मात्र त्याचा तपास लागला नाही.

गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता हा तरुण सांगली तालुक्यातील कडेपूरचा असल्याचे समजले. कडेपूरच्या स्थानिक पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क साधला असता, तो पुराच्या पाण्यातून पोहून बाहेर निघाला आणि त्याच्या बायकोजवळ रांजणगाव येथे पोहोचला असल्याचे समजले. एकीकडे त्याच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी यामध्ये ग्रामस्थ आणि प्रशासनाची मात्र दमछाक झाली आहे.

माझी बायको रांजणगाव येथे कामाला आहे. तिला दिवाळीसाठी आणायला काल सायंकाळी कऱ्हाड येथून उशिरा निघालो. रात्री बारा वाजता मुर्टीच्या ओढ्यात अचानक पाणी वाढल्याने मी पुराच्या पाण्यात वाहत गेलो. मला पोहता येत होते, एका झाडाचा आधार घेत बाहेर निघालो आणि एका ट्रकला हात करून रांजणगाव येथे पोहोचलो.

Web Title: He swam out of the flood and has met his wife pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.