तो शिकवतो अंध मुलामुलींना मल्लखांब .. पुणेकर तरुणाची प्रेरणादायी कहाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:34 PM2021-03-13T20:34:01+5:302021-03-13T20:36:13+5:30

१० वर्षात १००० मुलामुलींना प्रशिक्षण. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली नोंद.

He teaches Mallakhamba to blind boys and girls .. Inspirational story of a Pune yongster | तो शिकवतो अंध मुलामुलींना मल्लखांब .. पुणेकर तरुणाची प्रेरणादायी कहाणी..

तो शिकवतो अंध मुलामुलींना मल्लखांब .. पुणेकर तरुणाची प्रेरणादायी कहाणी..

googlenewsNext

आपली कला इतरांपर्यंत पोहोचावी हेच त्याचा ध्येय. यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो मात्र अगदी वेगळा.. मल्लखांबपटू असणाऱ्या पुण्यातल्या एका तरुणाने ध्यास घेत अंध मुलं आणि मुलींना मल्लखांब आणि रोपे मल्लखांब शिकवला. त्याचा याच कामाची नोंद आता थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.

श्रीनिवास हवालदार अस या तरुणाचा नाव. वयाचा ८व्या वर्षी त्यांनी टिळक रस्त्यावरचा महाराष्ट्र मंडळात मल्लखांब शिकायला सुरुवात केली. त्यानंयर शालेय, विद्यापीठ असे अनेक टप्पे पार करत त्यांचा राष्ट्रीय पातळीवर पण खेळून झालं. पण स्वतःचा पुरतं बघायचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे अर्थातच त्याचा पलीकडे जात आपलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करायचं ठरवलं. पण यासाठी पण त्यांनी निवड केली ती थेट अंध मुलांची. 

ज्या मुलांना मल्लखांब कसा दिसतो ते हि माहित नाही त्यांना मल्लखांब शिकवायचा कसा? हवालदार सांगतात " साधारण २०११ मध्ये मी कोरेगाव पार्क च्या अंध शाळेत गेलो. तिथे शाळेत मल्लखांब तर होता पण मुलांना प्रशिक्षक नसल्यामुळे तो शिकवलाच जात नव्हता,तिथल्या शिक्षकांशी बोलून मी मुलांना शिकवायची परवानगी घेतली. अर्थात मुलांना मल्लखांब म्हणजे काय हेच मुलांना माहित नव्हतं. आधी त्यांना बेसिक गोष्टी सांगितल्या. ग्रीप कशी पकडायची इथं पासून शिकवायला सुरुवात केली. या मुलांना  स्पर्शज्ञानाने शिकवाव लागतं काहींना जवळच तर बऱ्याच मुलाना अजिबातच दिसत नाही. त्यामुळे एक एक करत त्यांना शिकवायला सुरुवात केली."

गेल्या १० वर्षात इ मुलं मुली रोपे मल्लखांब आणि मल्लखांबात तरबेज झाली आहेत. इतकी कि पुण्यातल्या गणपती मिरवणुकीपासून ते थेट डान्स इंडिया डान्स पर्यंत अनेक ठिकाणी या मुलांनी हजेरी लावत यशस्वी प्रात्यक्षिक सादर केली आहेत.  हवालदार यांनी सुद्धा आता अनेक ठिकाणी मल्लखांब केंद्र सुरु केली. कोरोना मुळे सध्या हे सगळं थांबलं आहे. पण त्या दरम्यान आता त्यांनी ध्यास घेतला आहे तो या मुलांना शिकवायला साधना तयार करण्याचा. त्यासाठी आता त्यांनी ऑडिओ बुक निर्मिती केली आहे. त्या बरोबरच या मुलांसाठी ऍप निर्माण करायचा हि त्याचा प्रयत्न सुरु आहे. 

याच सगळ्या कार्याची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. 

 

Web Title: He teaches Mallakhamba to blind boys and girls .. Inspirational story of a Pune yongster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.