जामिनासाठी खर्च केलेले १ लाख २० हजार रुपये वसुलीसाठी घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:12 AM2021-03-28T04:12:18+5:302021-03-28T04:12:18+5:30

पुणे : तरुणाच्या जामिनासाठी केलेला खर्च वसुलीसाठी सराईत गुंडाने घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर ...

He threatened to break into the house and kill himself to recover Rs 1 lakh 20,000 spent on bail | जामिनासाठी खर्च केलेले १ लाख २० हजार रुपये वसुलीसाठी घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

जामिनासाठी खर्च केलेले १ लाख २० हजार रुपये वसुलीसाठी घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

Next

पुणे : तरुणाच्या जामिनासाठी केलेला खर्च वसुलीसाठी सराईत गुंडाने घरात शिरून तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश नानाभाऊ लंके (वय ४७, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी उषा विभीषण काळे (वय ३८, रा. आनंद पार्क, धानोरी रोड) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रकाश लंके हा सराईत गुन्हेगार आहे. काळे यांचा मुलगा लंकेबरोबर राहतो. त्याला सोडविण्यासाठी १ लाख २० हजार रुपये खर्च केले असे लंके याचे म्हणणे आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी लंके काळे यांच्या घरात शिरला. त्याने तुमचा मुलगा कोठे आहे, ते सांग, नाही तर मी तुमचे खानदान संपवून टाकीन, असे म्हणून लोकांना दमदाटी केली. त्यानंतर काळे यांना तुमचा मुलगा माझ्या ताब्यात दे नाही तर मला १ लाख २० हजार रुपये दे, असे म्हणून त्यांना व त्यांच्या सासू शालन काळे यांना शिवीगाळ केली. तेव्हा फिर्यादी यांनी आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने हात पाय तोडून टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या घरातील भिंतीवर काहीतरी मारून लाईटचा बोर्ड तोडला. घरातील सामानाची आदळआपट केली. विश्रांतवाडी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: He threatened to break into the house and kill himself to recover Rs 1 lakh 20,000 spent on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.