उसने पैसे लवकर न दिल्याने तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:07+5:302021-06-28T04:08:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उसने दिलेल्या पैशापैकी शिल्लक राहिलेले पैसे लवकर परत देत नसल्याच्या कारणावरून चाकूने तरुणावर सपासप ...

He tried to kill the young man by attacking him for not paying the money early | उसने पैसे लवकर न दिल्याने तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

उसने पैसे लवकर न दिल्याने तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उसने दिलेल्या पैशापैकी शिल्लक राहिलेले पैसे लवकर परत देत नसल्याच्या कारणावरून चाकूने तरुणावर सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अकिल सय्यद (वय ४२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी साबीर रशिद सय्यद (वय ३५, रा. सुरक्षानगर, वैदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वैदवाडीतील रेल्वे मार्गाच्या भिंतीजवळ २५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.

साबीर यांनी आरोपीकडून उसने पैसे घेतले होते. त्यापैकी ४० हजार रुपये परत करण्याचे राहिले होते. हे बाकी राहिलेले ४० हजार रुपये लवकरात लवकर पाहिजे, असे म्हणून आरोपी अकील याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादी यांच्या छातीवर, पोटावर, गुप्तांगाचे खाली व पाठीवर सपासप वार केले व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: He tried to kill the young man by attacking him for not paying the money early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.