बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी 'तो' करायचा घरफोड्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By विवेक भुसे | Published: August 17, 2023 04:08 PM2023-08-17T16:08:13+5:302023-08-17T16:08:34+5:30

एका घरफोडीत त्याच्या हाती भारतीय व परदेशी चलन हाती लागले...

'He' used to burglarize houses to please his girlfriend in Budhwar Peth police arrested him | बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी 'तो' करायचा घरफोड्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी 'तो' करायचा घरफोड्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

पुणे : बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणारा रात्री बंद असलेल्या कार्यालयामध्ये घरफोडी करत. एका घरफोडीत त्याच्या हाती भारतीय व परदेशी चलन हाती लागले. हे पैसे उडवत असतानाच चंदननगर पोलिसांनी हरियानातील या चोरट्याला अटक केली.

फुरकान नईम खान (वय २१, रा.पानिपत,हरियाना) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी चोरी केलेले परकीय चलन जप्त केले आहे. खराडी येथील सिनॅप्स लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये ७ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्याने तेथून ३ लाख ७ हजार ४९२ रुपयांचे भारतीय व परकीय चलन चोरी केले होते.याबाबत पवन चव्हाण (वय ३०) यांनी चंदननगर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड आणि विकास कदम यांना तांत्रिक विश्लेषन आणि बातमीदारामार्फत खान याच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानेच ही घरफोडी केली असून सध्या तो पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सॅमसंग स्टोअर, खराडी मोर मॉलजवळ या ठिकाणी अशाचप्रकारे चोरी केल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे कर्मचारी सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, विकास कदम यांच्या पथकाने केली.

दिवसा शेफ रात्री घरफोड्या

खान हा शहरातील मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो. तर रात्रीच्यावेळी तो घरफोड्या करत होता. बंद असलेली ऑफिसेस शोधून डल्ला मारण्यात तो पटाईत आहे. इमारतीवर तो पाईपच्या साह्याने चढतो. त्यानंतर तो बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश करत होता. खराडी येथील कंपनीतून चोरलेले परकीय चलन कोणी त्याच्याकडून न घेतल्याने त्यापैकी काही त्याने टाकून दिल्याचे सांगतो. भारतीय चलन मात्र त्याने आपल्या मैत्रिणीवर उघडविले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 'He' used to burglarize houses to please his girlfriend in Budhwar Peth police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.