Pune Crime: पत्नीला विवस्र नाचायला लावून तो करायचा शूटिंग; विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Updated: August 10, 2023 17:38 IST2023-08-10T17:38:12+5:302023-08-10T17:38:31+5:30
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला...

Pune Crime: पत्नीला विवस्र नाचायला लावून तो करायचा शूटिंग; विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : अश्लील फिल्म दाखवून पत्नीला विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. यानंतर त्या नानापेठेत पतीबरोबर राहत होत्या. मात्र, फिर्यादी यांना तो अश्लील चित्रफीत दाखवून अनैसर्गिक संभोग करत असे. तसेच विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे चित्रीकरण करत असे. त्याला विरोध केल्यावर ते शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत असे. या घटनेनंतर पत्नी माहेरी निघून आली.
तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने फिर्यादीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांची बहीण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.