Chain Pulling In Train: सावधान! सामान राहिले म्हणून रेल्वेची साखळी ओढल्यास अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:42 AM2022-01-31T11:42:28+5:302022-01-31T11:42:39+5:30

मागील वर्षभरात एकट्या पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या असून, यात ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक झाली आहे

He will be arrested if he pulls the railway chain as his luggage remains in pune station | Chain Pulling In Train: सावधान! सामान राहिले म्हणून रेल्वेची साखळी ओढल्यास अटक होणार

Chain Pulling In Train: सावधान! सामान राहिले म्हणून रेल्वेची साखळी ओढल्यास अटक होणार

Next

पुणे : रेल्वेने प्रवास करताना आपला सोबतचा प्रवासी अथवा आपले सामान खाली राहिले म्हणून जर कुणी साखळी ओढून रेल्वे थांबविली, तर त्यास अटक केली जात आहे. पुणे स्थानकांवर गेल्या काही दिवसांत अशा घटनांत वाढ झाली आहे. मागील वर्षभरात एकट्या पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या असून, यात ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक झाली आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत चेन ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही.

आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यांत साखळी लटकविलेली असते. प्रवाशांनी ती ओढल्यावर काही सेकंदातच रेल्वे थांबते; मात्र गेल्या वर्षभरात तब्ब्ल ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली. यात प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने त्यांनी संबंधित प्रवाशाला गाडीतून ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे.

साखळी ओढल्यावर काय होते 

साखळी ओढल्यावर रेल्वे इंजिनचा बीपी प्रेशर डाऊन होतो म्हणजेच बोगीच्या खालच्या पाईपमधून मोठा आवाज करून हवा बाहेर पडते. त्यामुळे प्रेशर डाऊन होते. त्यामुळे गाडी थांबते. कोणत्या डब्यात साखळी ओढली आहे हे कळण्यासाठी डब्यांच्या आत देखील लाईट लागते व बाहेर देखील इंडिकेस्टस् लाल लाईट लागते. शिवाय याची माहिती रेल्वे चालकाला देखील मिळते. गाडी सेक्शनमध्ये असेल तर सहायक रेल्वे चालक व गार्ड हे कोचची पाहणी करतात.गाडी स्थानकावर असेल त्यावेळी आरपीएफकडून शोध घेतला जातो.

कोणत्या परिस्थितीत साखळी ओढली पाहिजे

रेल्वे प्रशासनाने यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गाडीत आग लागली असेल किंवा डब्यातून धूर येत आहे,कोणी प्रवासी दरवाजातून पडला असेल अथवा कुणी खिडकीला लटकत असेल, जर कोणी डब्याखाली येत असेल अशावेळी साखळी ओढली तर त्यास रेल्वेची हरकत नाही.

Web Title: He will be arrested if he pulls the railway chain as his luggage remains in pune station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.