एका महिन्यात पुण्याच्या रिंगरोडची मोजणी पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:35+5:302021-03-24T04:11:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रिंगरोडसाठीची ...

He will complete the counting of Pune's ring road in a month | एका महिन्यात पुण्याच्या रिंगरोडची मोजणी पूर्ण करणार

एका महिन्यात पुण्याच्या रिंगरोडची मोजणी पूर्ण करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रिंगरोडसाठीची मोजणी येत्या ३० एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक-१) म्हणून राज्य शासनाकडून महामार्ग महाराष्ट्र अधिनियम १९५५ अन्वये घोषित केला आहे. राज्य महामार्गासाठी जमिनीच्या भूसंपादनाच्या अधिसूचनाही राज्य शासनाने निर्गमित केली आहे. पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)च्या मोजणी व भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने मंगळवार (दि.२३) रोजी रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आढावा घेतला. ‘पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी प्रक्रियेला गती देण्यासोबतच ३० एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकल्पाची माहिती, प्रक्रियेत विविध विभागांची जबाबदारी व समन्वय, प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, संयुक्त मोजणी प्रक्रिया आदींसह प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी सुरू करण्यापूर्वी सदर गावातील नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची रूपरेषा सांगावी, तसेच नागरिकांना असणाऱ्या शंकाचे समाधान करावे, जेणेकरून भुसंपादन, मोजणी प्रक्रियेला गती मिळेल. मोजणी करतेवेळी संपादन होणाऱ्या जागेचे मूल्यांकन करण्यासाठी मोजणीवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उपस्थित राहावे, तसेच मोजणी ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले.

Web Title: He will complete the counting of Pune's ring road in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.