अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:56+5:302021-09-17T04:13:56+5:30
भोर: अडचणीच्या काळात पक्षासोबत राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी न्याय मिळेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त ...
भोर: अडचणीच्या काळात पक्षासोबत राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी न्याय मिळेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
भोर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच सहकार क्षेत्रातील विविध प्रकारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संगमनेर येथे संपन्न झाला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आली.
सुळे म्हणाल्या की, अडचणींच्या काळात पक्ष संघटनेबरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आपल्या पक्षाची ताकत कशी वाढेल? यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाची जबाबदारी असून तुम्ही असे काम करा की तुमचं काम पाहून पक्ष तुम्हालाच तिकीट, पद देईल. तसेच कोविडकाळात महाविकास आघाडीने व्यवस्थित व नियोजनबध्द काम गेली दीड वर्ष केले आहे. केंद्राचा अहवाल सांगत असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी गाव, वाडी, वस्तीवर जाऊन आपण केलेली कामे पोहोचवावीत. ओबीसी आरक्षणचा पुढील आठ दिवसांत निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सर्वसामान्य माणसात जाणारा पक्ष राष्ट्रवादी पक्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मदतीने कोविडकाळात कोविड सेंटर चालू करून चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून शरद भोजन, रेशनिंग, शेतकऱ्यांना डिझेल पुरवणे, आरोग्य विभागात कर्मचारी भरणे इत्यादी मदत होण्याची कामे पक्ष संघटनेच्या मदतीने केली असल्याची माहिती या वेळी सांगितली.
भालचंद्र जगताप,,चंद्रकांत बाठे,मानसिंग धुमाळ, वंदना धुमाळ,भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.त्याच बरोबर राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार यावेळी बोलून दाखवले. या कार्यक्रमास प्रकाश तनपुरे, यशवंत डाळ,भोर शहर अध्यक्ष नितीन धारणे,विद्या यादव,सुहित जाधव हसीना शेख,संदीप नांगरे,गणेश निगडे केतन चव्हाण,कुणाल धुमाळ सह पक्षाचे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोर तालुका युवक अध्यक्ष गणेश खुटवड यांनी केले, तर आभार बारामती लोकसभा युवक अध्यक्ष स्वप्निल कोंडे यांनी व्यक्त केले.
१६ भोर