राज्यात प्रथम येऊनही नाही घेणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:11+5:302020-12-02T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये सानिका गुमास्ते हिने तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये सानिका गुमास्ते हिने तर अनिश जगदाळे याने पीसीएम ग्रुपमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून दोघेही राज्यात कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणार नाहीत. कारण सानिकाने यापूर्वीच आयआयटी कानपूरमध्ये तर अनिशने बीजे मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेत प्रथम क्रमांक मिळूनही चिराग फलोर याने देशात कुठेही प्रवेश घेतला नव्हता. आता सीईटी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सानिका अभियांत्रिकी महाविद्यालयात तर अनिशही सीईटीच्या गुणांच्या आधारे इतर कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणार नाहीत. त्यामुळे अव्वल क्रमांक पटकावणारे विद्यार्थी एकाच वेळी विविध प्रवेश पूर्व परीक्षा देत स्वत:साठी एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून ठेवत आहेत.
-
नीट परीक्षेत ६७० गुण मिळवून मी बी.जे.मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.केवळ पर्याय म्हणून मी सीईटी परीक्षा देऊन ठेवली होती. मी अकरावी-बारावीचे शिक्षण एमएमसीसी महाविद्यालयात घेतले. माझी आई डॉक्टर असून वडिल इंजिनिअर आहेत.पुढे न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.
- अनिश जगदाळे, विद्यार्थी