तेराशे रुपये स्क्वेअर फुट दराने ८१ फ्लॅट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:02+5:302021-07-28T04:12:02+5:30

जुन्नर : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जुन्नर नगर पालीका क्षेत्रातील बेघर गरजु नागरीकांसाठी ऐकुन ८१ ...

He will provide 81 flats at the rate of Rs. 1300 per square foot | तेराशे रुपये स्क्वेअर फुट दराने ८१ फ्लॅट देणार

तेराशे रुपये स्क्वेअर फुट दराने ८१ फ्लॅट देणार

Next

जुन्नर : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जुन्नर नगर पालीका क्षेत्रातील बेघर गरजु नागरीकांसाठी ऐकुन ८१ फ्लॅटची इमारत बांधण्यात येणार असून बांधकाम खर्चाचे दरात म्हणजे १३०० ते १३५० रुपये प्रती चौरस फुट दराने माफक किंमतीत हे फ्लॅट देण्यात येणार आहेत. असा निर्णय जुन्नर नगर पालीकेच्या विशेष सभेत घेण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज पठाण यांनी दिली.

जुन्नर नगर पालीकेच्या विशेष सभेचे आयोजन गुगल मिट च्या माध्यमातून नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी केले होते.बेघर गरजु नागरीकांसाठी एकूण ८१सदनिका असलेली इमारत बांधण्यात येणार असून प्रत्येक सदनिकेचे क्षेत्र ३५० चौरस फुट असणार आहे. एकूण बांधकाम २८३५० चौरस फुट १०ते ११ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. परंतु गरजु व बेघर नागरीकांना या सदनिका द्यायच्या आहेत. या साठी जागा देखील शासनाची वापरण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केवळ बांधकाम खर्चात म्हणजे १३५० रुपये प्रती चौरस फुट दराने सदनिका द्याव्यात यासाठी तयार केलेले अंदाजपत्रक बदलावे व प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चाचे (अंदाजे ४कोटी )एवढे अंदाजपत्रक बनवावे अशी सुचना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज पठाण , नगरसेवक भाऊ कुंभार ,जमीर कागदी, नगरसेविका अलका फुलपगार यांनी मांडली. सुचनेनुसार ठराव केला असल्याची माहीती पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या माध्यमातून गरजु बेघर नागरीकांसाठी अत्यल्प दरात घर मिळावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचे नगरसेवक भाऊ कुंभार यांनी सांगितले.

--

चौकटीसाठी

--

नगराध्यक्ष शाम पांडे -जुन्नर नगरपालिकेच्या वतीने १० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला म्हाडा कडून अंतीम मंजुरी देण्यात आल्यावर सदर प्रकल्प सुरू होणार आहे. याचे शासकीय नियमानुसार व शासकीय दरपत्रकानुसार अंदाजपत्रकांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने काढणार असून म्हाडाकडे सुमारे ५५० नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. महाराष्ट्रातील दुसरी पुणे जिल्ह्यातील पहिली नगरपालिका घरकुल योजना राबविणारी जुन्नर नगरपालिका करत आहे. सदरहू लाभार्थी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार, मुद्रांक शुल्क, गृहकर्ज व्याजदर यामध्ये सरासरी ५ लक्ष रुपये प्रत्येकी लाभार्थ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. आजपर्यंत सदनिका, नवीन घर खरेदीसाठी कर्ज संलग्न व्याज योजनेमध्ये सुमारे २८५ नागरिकांना रक्कम रुपये २ ते २.५० लक्ष रुपयांचा फायदा होत असून स्वतच्या मालकीच्या जागा, कच्च्या घराचे पक्के घर करण्यासाठी सुमारे २५९ अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येकी सरासरी २.५० लाख रुपये अनुदान मिळणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.

Web Title: He will provide 81 flats at the rate of Rs. 1300 per square foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.