शीर्षासन करा निद्रा, डोळे छान ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:13 AM2021-09-06T04:13:13+5:302021-09-06T04:13:13+5:30
प्रथम पुढे वाकून गुडघे जमिनीवर टेकवावे आणि दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत जुळूवन हात कोपरापासून जमिनीवर ठेवलेल्या वस्त्रावर टेकावे. त्यानंतर ...
प्रथम पुढे वाकून गुडघे जमिनीवर टेकवावे आणि दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत जुळूवन हात कोपरापासून जमिनीवर ठेवलेल्या वस्त्रावर टेकावे. त्यानंतर मस्तकाच्या टाळूचा पुढचा भाग, एका मऊ फडक्याच्या घडीवर हाताच्या पंज्यांना लागून ठेवावा. त्यावेळी मनगटे डोक्याच्या दोन्ही बाजूंना येतील अशी ठेवावी. नंतर गुडघे वर उचलून हळूहळू छातीजवळ आणावे. हात आणि डोके यांच्या आधारावर पाय जमिनीपासून वर उचलावे व गुडघ्यांजवळ वाकवून मांड्यांजवळ आणावे. ही प्रथमावस्था. पाठ ताठ करून शरीराचा भार हाताच्या कोपरांवर घ्यावा. यानंतर दोन्ही पाय उचलून वर करावे व मांड्या सरळरेषेत एकमेकींजवळ स्थिर ठेवाव्यात. गुडघे सरळ न करता पाय मागे घ्यावे, ही दुसरी अवस्था. नंतर दोन्ही पाय सरळ रेषेत वर ताणून ठेवावे. डोके, छाती, कमर, गुडघे , पायाचे अंगठे हे एका समरेषेत यावेत. श्वासोच्छ्वास नाकानेच संथ करावा. शरीर स्थिर राहील असे पहावे. या सर्व अवस्था क्रमाक्रमाने व हळूहळू अत्यंत सावकाश साध्य कराव्यात.
मेंदूला या आसनाने प्राणवायू मिळतो. शीर्षासनाने सगळ्याच स्नायूंना व्यायाम मिळतो. स्नायूंमध्ये काही कारणांनी तणाव आला असेल तर तो तणाव कमीत कमी वेळेत शिथिल करण्याचा उपाय म्हणजे शीर्षासन. शरीरातला सगळाच रक्तप्रवाह या आसनाने सामान्य पातळीवर येतो आणि रक्तदाबावर नियंत्रण येते. हायपरटेन्शनचा त्रास असणारांनी तर हे आसन दररोज आणि अवश्य केले पाहिजे. शीर्षासनाने डोक्याला सर्वात जास्त व्यायाम मिळत असल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेन या विकारावर चांगलाच उपचार होतो.
हे आसन डोळ्यांचे आरोग्य, रक्तशुद्धी, उत्साह व शांत निद्रा यांसाठी करावे. तसेच केसांसाठी देखील हे आसन उपयुक्त आहे. शीर्षासनाने डोक्याकडे वाहणार रक्तप्रवाह डोळ्यांनाही मिळतो आणि दृष्टीचे तेज कायम राहते. डोळ्यांच्या संदर्भातल्या सगळ्याच तक्रारी शीर्षासनाने कमी होतात. विशेषत: वाढत्या वयानुसार मंद होणारी दृष्टी शीर्षासनाने कायम तेज राहते.