पाण्याच्या वादातून घातला डोक्यात दगड

By Admin | Published: December 28, 2016 04:25 AM2016-12-28T04:25:34+5:302016-12-28T04:25:34+5:30

बोरीबेल (ता.दौंड) परिसरातील गाडेवाडी येथे शेतीच्या पाण्यावरून चंद्रकांत अवचर (रा. गाडेवाडी,ता. दौंड) या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याने ते जखमी झाले आहेत.

The head stone covered with the promise of water | पाण्याच्या वादातून घातला डोक्यात दगड

पाण्याच्या वादातून घातला डोक्यात दगड

googlenewsNext

दौंड : बोरीबेल (ता.दौंड) परिसरातील गाडेवाडी येथे शेतीच्या पाण्यावरून चंद्रकांत अवचर (रा. गाडेवाडी,ता. दौंड) या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी मच्छिंद खळदकर, राहुल खळदकर, पारुबाई खळदकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दिलीप भाकरे यांनी दिली.
सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास पाटबंधारे खात्याच्या कॅनॉलमधील पाणी शेतीला देण्यासाठी चंद्रकांत अवचर आले होते. दरम्यान पाटाने पाणी नेल्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान होते, असे खळदकर यांनी सांगितल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर मच्छिंद्र आणि राहुल या दोघांनी धक्काबुकी केली तर पारुबाई यांनी चंद्रकांत अवचर यांच्या डोक्यात दगड मारला. याप्रकरणी मच्छिंद्र खळदकर, राहुल खळदकर यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: The head stone covered with the promise of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.