हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून...

By admin | Published: July 9, 2015 03:18 AM2015-07-09T03:18:03+5:302015-07-09T03:18:03+5:30

पर्वती दर्शन परिसरात दोन गटांत झालेली हाणामारी केवळ दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून झालेल्या किरकोळ वादातून झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

As the headlight fell on the eyes ... | हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून...

हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून...

Next

पुणे : पर्वती दर्शन परिसरात दोन गटांत झालेली हाणामारी केवळ दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून झालेल्या किरकोळ वादातून झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एक तरुण त्याची दुचाकी साई मित्रमंडळासमोर लावत असताना, दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला, म्हणून तेथे बसलेल्या काही तरुणांसोबत त्यांची वादावादी झाली. त्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. स्थानिक पोलीस चौकीतील पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जमाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. दरम्यान, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते घटनास्थळी धावले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरुवातील लाठीमार केला. त्याचा उपयोग न झाल्याने नाइलाजास्तव हवेमध्ये दोन गोळ्या झाडल्यावर जमाव पांगला.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे दोन्ही समुदायांच्या लोकांची संमिश्र वस्ती आहे. त्यामुळे जमाव जमण्यास वेळ लागला नाही. तुर्तास तरी ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसत नाही; परंतु तसा तपासही सुरू असल्याचे रामानंद म्हणाले.
गेल्या तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांचा या घटनेशी संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट
केले आहे. पोलिसांचा प्रतिसाद (रिस्पॉन्स टाइम) कमी झाला आहे. याठिकाणी नागरिकांशी संवाद, पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे शांतता प्रस्थापित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

‘एसआरपीएफ’ही तैनात
घटनास्थळावर एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास प्रगतिपथावर आहे. दोन्ही बाजूंच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक झालेली असल्याचेही सांगण्यात आले. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला नाही. मंगळवारच्या घटनेचे शहरात इतरत्र पडसाद पोलिसांनी उमटू दिलेले नाहीत.

Web Title: As the headlight fell on the eyes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.