विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

By admin | Published: September 25, 2015 01:13 AM2015-09-25T01:13:50+5:302015-09-25T01:13:50+5:30

अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत.

Headmaster is now home to student accident insurance | विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

Next

पुणे : अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल मागविला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगतिले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहिली ते बारावीतील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘राजीव गांधी
शालेय विद्यार्थी अपघात विमा’ ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. मात्र, या योजनेविषयी पालकांना माहिती नसल्याने प्रस्तावच येत नाहीत.
या योजनेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागाला पत्र पाठवून प्रस्ताव कमी असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून अपघातात विद्यार्थी मयत होत आहेत; मात्र प्रस्ताव कमी आहेत. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना प्रस्ताव दाखल करण्यास प्रवृत्त करावे व सहकार्य करावे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व तालुक्यांतील गटशिक्षण अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठविले असून, कार्यवाही करावी; तसेच आज अखेरपर्य$ंतचा निरंक अहवाल पाठवावा, असे कळविले आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखाना स्वत: प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Headmaster is now home to student accident insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.