निरामय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:13+5:302021-07-19T04:08:13+5:30
पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला ...
पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला आहार, जेवणाच्या वेळा, बाहेरचे खाणे टाळणे आदी उपाय केले तर तुम्ही निरोगी राहू शकाल.
माॅन्सून सुरू होण्याआधीच अनेक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू होताना दिसतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्यातून सर्वाधिक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी पिण्याबाबत योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. तसेच पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- पाणी उकळून आणि जास्तीत जास्त प्यायला पाहिजे
- शक्यतो कोल्डड्रिंकचा मोह टाळावा.
- हलके व पौष्टिक जेवण घ्यायला हवे
- या दिवसात पालक, मुळा, कांदा व लसूण खाणे टाळावे. कारण जमिनीत पावसामुळे अनेक जीवजंतू निर्माण होत असतात. त्यामुळे पालेभाज्या कमी खाव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
- या दिवसात सुकामेवा कमी प्रमाणात खावा. कारण आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. त्यामुळे शक्यतो जड अन्न घेऊ नये. हलके व पचायला सोपे जाईल असेच अन्न घ्यावे.
- आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.
- बाहेरचे उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कारण पावसाळ्यात अनेकदा सर्वत्र घाण असते. तसेच माशा, मच्छर तयार झालेले असतात. काही ठिकाणी तळण्यासाठी तेच तेल अनेकदा वापरले जाते. त्यातून अनेक आजार पसरू शकतात.