आरोग्य अर्थसंकल्प - प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:12+5:302021-03-09T04:14:12+5:30
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ७५०० कोटींची तरतूद केली आहे. सरकार तुटीत असतानाही आरोग्य क्षेत्रासाठी केलेली भरीव तरतूद स्वागतार्ह ...
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ७५०० कोटींची तरतूद केली आहे. सरकार तुटीत असतानाही आरोग्य क्षेत्रासाठी केलेली भरीव तरतूद स्वागतार्ह आहे. या तरतुदीचा उपयोग प्राथमिक आरोग्य केंद्रे, नगरपालिका आणि महानगरपालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालये यांच्यामधील व्यवस्था सुधारण्यासाठी, खाटा वाढवण्यासाठी केला पाहिजे. नव्याने काही रुग्णालये सुरु करणार आहेत. आपल्याकडे डॉक्टर आणि नर्सेसची आजही कमतरता आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, वैैद्यकीय तंत्रशिक्षण महाविद्यालये यांवर भर द्यायला हवा. शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत उपकरणे उपलब्ध व्हावीत.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र
---
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करा
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आलेली वाढ स्वागतार्ह आहे. मात्र, आणखी भरीव वाढ होणे अपेक्षित होते. कोरोनाच्या संकटातून धडा घेऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जास्तीत जास्त सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आणि तरतुदीचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे.
- अभिजीत मोरे, जन आरोग्य अभियान