राष्ट्रवादीकडून आदिवासी महिलांसाठी आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:39+5:302021-08-12T04:14:39+5:30
शिबिरामध्ये दुर्बल घटकातील महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिक महिला यांची हिमोग्लोबिन तपासणी शुगर ...
शिबिरामध्ये दुर्बल घटकातील महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिक महिला यांची हिमोग्लोबिन तपासणी शुगर तपासणी व विविध आजारांची तपासणी करण्यात आली. जुन्नर शहर अध्यक्षा आरती ढोबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच आमदार अतुल शेठ बेनके, गौरी बेनके यांचे हस्ते आरोग्य सेविका, शिक्षिका व इतर प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या महिलांना कृतज्ञता पुरस्कार देण्यात आले.
या वेळी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष भूषण ताथेड, पाडळी कबाडवाडीचे सरपंच संतोष केदारी, माजी सरपंच ज्ञानेश्वर कबाडी, ग्रामपंचायत सदस्य राजू कारभळ, बाळा सदाकळ, अरुण पापडे, गणेश कंठाले, अजिंक्य घोलप, विनायक पापडे, पुष्पा बुट्टे, देशमाने आदी उपस्थित होते.
संतोष ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले.
--
फोटो क्रमांक : १०जुन्नर आदिवासी महिलांचे आरोग्य शिबिर
फोटो ओळी : आरोग्य सेविका, शिक्षिका यांचा सत्कार करताना आमदार अतुल बेनके, गौरी बेनके.
100821\10pun_8_10082021_6.jpg
फोटो क्रमांक : १०जुन्नर आदिवासी महिलांचे आरोग्य शिबीरफोटो ओळी : आरोग्य सेविका, शिक्षिका यांचा सत्कार करताना आमदार अतुल बेनके, गौरी बेनके