महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:46+5:302021-03-08T04:10:46+5:30
नगर रोड गौतमलब्धि फाउंडेशन व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वडगावशेरी तसेच कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने या ...
नगर रोड गौतमलब्धि फाउंडेशन व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वडगावशेरी तसेच
कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रफुल्ल शांतिलाल कोठारी यांच्या कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित शिबिरात राहुल चोरडिया, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता सुराणा, डॉ. प्रणिता भटेवरा यांच्या मार्फत कॅन्सर करता पेप स्मियर तपासणी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सुराणा यांच्या मार्फत गुडघ्याची तपासणी, रक्त व दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.
फाऊंडेशनकडून प्रत्येक महिन्यास वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात आतापर्यंत रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन झाले आहे. गौतम निधी कलशच्या माध्यमातून आलेल्या धनराशीतून सेवा, शिक्षा, विकासाच्या माध्यमातून समाजातील गरजूंना नेहमीच मदत केली जाते.
याप्रसंगी प्रफुल्ल कोठारी यांनी महिलांच्या आरोग्य तपासणीचे महत्व आपल्या संबोधनातून सांगितले. तसेच
शांतिलाल बोरा, किरण बोरा, गौतम बुरड़, विमलताई बाफना, वैशाली बंब, संतोष ललवाणी ॲड. नितीन संकलेचा, गौरव ब्रम्हेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिरात 145 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी वडगाव शेरी श्री संघाच्या महिला मंडळतर्फे सामाजिक कार्यक्रत्या पूर्णिमा गादिया, प्रतिभा फिरोदिया यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन संघाचे अध्यक्ष् महावीर नहार यांच्या मार्गदर्शनात भरत नहार, सिद्धार्थ भटेवरा,चिराग साबद्रा,महावीर देसरडा, अमित पारख, यश लुंकड़,डॉ प्रणीत नहार,नवीन भंडारी, विपिन मुनोत, दर्शन चोरडिया, गिरीष लुणावत,
पायल कटारिया, अंजली कोठारी, अश्विनी लोढा, प्राची नहार, मंजू गांधी यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ललवाणी, ग़ौरव ब्रम्हेचा यांनी केले.