काळूस येथे अठराशे कुटूंबांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:59+5:302021-05-12T04:09:59+5:30

गावात आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमांची आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, सरपंच धनश्री पवळे व उपसरपंच यशवंत ...

Health check-up of eighteen hundred families at Kalus | काळूस येथे अठराशे कुटूंबांची आरोग्य तपासणी

काळूस येथे अठराशे कुटूंबांची आरोग्य तपासणी

Next

गावात आयोजित करण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमांची आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, सरपंच धनश्री पवळे व उपसरपंच यशवंत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच गणेश पवळे, योगेश आरगडे, पवनराजे जाचक, मोहन पवळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप टेमगिरे, दत्तात्रय पोटवडे, अनिल आरगडे, माणिक खैरे, रोहिदास पवळे, गणेश पवळे, स्मिता वानखेडे आदींसह अन्य ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर सर्वेक्षणासाठी गावात ३५ पथकांची नेमणूक करण्यात आली होती. गावातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, गावात संसर्ग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली असून, नागरिकांनी तोंडाला मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, तसेच वेळोवेळी हात धुणे अशा प्रकारची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पाच दिवस बंद ठेवण्याच्या आवाहनाला नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

काळूस (ता. खेड) येथील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करताना. (छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Health check-up of eighteen hundred families at Kalus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.