अटल आरोग्य रथाच्या माध्यमातून परिंचेत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:43+5:302021-08-18T04:16:43+5:30
पुरंदर तालुक्यातील गावात वाढत असलेल्या डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी महत्त्वाची आहे. ग्रामसचिवालयासमोर नागरिकांची मोफत ...
पुरंदर तालुक्यातील गावात वाढत असलेल्या डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी महत्त्वाची आहे. ग्रामसचिवालयासमोर नागरिकांची मोफत शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन तपासणी करुन रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आल्याने रुग्णांना फायदा झालेला असून, सर्व रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच ऋतुजा जाधव यांनी केले.
या तपासणीप्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे, म. प्रदेश युवा मोर्चा सचिव शैलेश तांदळे, सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत, माजी सरपंच समीर जाधव, सोपान राऊत, ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता नाईकनवरे, अजित नवले, सचिन पेशवे, सोमनाथ तांदळे, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे, गणेश भोसले, संदीप नवले, दत्तात्रय झेंडे, दत्तात्रय भोसले, चंद्रकांत खोपडे, बाळासाहेब जाधव, संजय जाधव, सचिन नवले आदीसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संयोजन पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा संघटन सरचिटणीस व गावच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी केले. श्रीकांत थिटे यांनी सूत्रसंचालन केले व दत्तात्रय राऊत यांनी आभार मानले.