गावच्या विकासाबरोबर नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:22+5:302021-09-26T04:11:22+5:30
चिंचोशी (ता.खेड) येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रमांर्तगत ''राष्ट्रीय पोषण माह'' साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ...
चिंचोशी (ता.खेड) येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान कार्यक्रमांर्तगत ''राष्ट्रीय पोषण माह'' साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपसरपंच माया निकम, ग्रामपंचायत सदस्या सीमा गोकुळे, कविता गोकुळे, मंगल शिंदे, अमोल कानडे, शिक्षिका मांजरे मॅडम, पाचारणे मॅडम, अंगणवाडी मदतनीस नजमा सैय्यद, आशा वर्कर ललिता भोसकर, सोनाली गाडेकर, संजीवनी निकम, कर्मचारी सचिन चव्हाण, बाळासाहेब गोकुळे आदींसह अन्य महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, पूरक पोषण आहाराचे प्रदर्शन आयोजित करून गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर एक ते एकोणीस या वयोगटातील मुलामुलींना ''जंतनाशक'' गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भविष्यात गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी संपूर्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच उज्ज्वला गोकुळे यांनी दिली.