आपत्ती काळात ‘सॅनिटायझर’ खरेदीत पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याची ‘खाबुगिरी’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 01:33 PM2020-06-13T13:33:17+5:302020-06-13T13:41:25+5:30

बाजारात उपलब्ध असलेल्या किंमतीपेक्षा तीन पटीने अधिक दराने केली खरेदी 

Health department buys sanitizer by more ammount of MRP in the during disaster period | आपत्ती काळात ‘सॅनिटायझर’ खरेदीत पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याची ‘खाबुगिरी’ 

आपत्ती काळात ‘सॅनिटायझर’ खरेदीत पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याची ‘खाबुगिरी’ 

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य खात्याकडून होणाऱ्या खरेदींचे ऑडिट व्हावे अव्वाच्या सव्वा किंमती देऊन होणारी खरेदी म्हणजे पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय

 निलेश राऊत -
पुणे : कोरोना आपत्ती काळात एकीकडे डॉक्टर्स, नर्ससह अन्य वैद्यकीय सहाय्यक सेवक वर्ग अहोरात्र काम करीत असतानाच, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा किंमती देऊन वैद्यकीय सामुग्रीची खरेदी केली जात आहे. याचा उत्तम नमुना नुकताच उघकीस आला असून, बाजारात 'सहाशे ते सातशे' रूपयांपर्यंत उपलब्ध असणारे '५ लिटरचे सॅनिटायझरचे कॅन' पालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल तीन पट अधिक दर देऊन खरे केली जात आहे. याचा उत्तम नमुना नुकताच उघकीस आला असून, बाजारात 'सहाशे ते सातशे' रूपयांपर्यंत उपलब्ध असणारे '५ लिटरचे सॅनिटायझरचे कॅन' पालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल तीन पट अधिक दर देऊन खरेदी केले आहे.
         

कोरोनाची चाहुल लागल्यापासून पुणे महापालिकेची यंत्रणा शहरात कामाला लागली़ मार्च महिन्यापासून दिवसामागे कोरोना रूग्ण वाढू लागले. अशावेळी रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, वैद्यकीय साधनांची कुठलीही कमतरता भासू नये यासाठी आरोग्य विभागाच्या भांडार विभागाकडून 'विना टेंडर' थेट साहित्य खरेदी सुरू झाली. यास प्रशासनाकडून खेरदी पश्चात एकगठ्ठा मान्यता स्थायी समितीकडून आजही घेण्यात येत आहे. 
           

परंतु, या खरेदी सध्या वादाच्या भोवºयात सापडल्या असून, याची प्रचिती आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या 'सॅनिटायझर'मध्ये दिसून आली आहे. सद्यस्थितीला अनेक कंपन्यांचे तसेच साखर कारखान्यंनी तयार केलेले चांगल्या प्रतीचे तसेच शासकीय निकषानुसार अल्कोहोल युक्त सॅनिटायझर बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत होलसेलमध्ये ५ लिटरच्या कॅनकरिता साधारणत: सहाशे ते सातशे रुपए (उत्तम प्रतीच्या) इतकी आहे, असे असताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भांडार विभागाकडून १ हजार ७०० रूपयांपेक्षा अधिक किंमत अदा करून पाच लिटर सॅनिटायझरचे कॅन खरेदी करण्यात आले आहेत.

 ही खरेदी करताना कारण देखील अजब देण्यात आले असून, बाजारात पाच लिटर सॅनिटायझरचे कॅनची किंमत, 'एमआरपी' ही २ हजार ५०० रुपए आहे. पण पुणे महापालिकेने यात तब्बल २८़५० टक्के सवलत घेऊन सॅनिटायझरची खरेदी केली असल्याचे सांगून, महापालिकेने कशी कमी किंमतीत खरेदी केली याचा डंका पिटला जात आहे. वस्तुत: बाजारात उपलब्ध असलेल्या कॅनवरील एमआरपी व प्रत्यक्ष विक्रीचा दर हा विक्रेत्याला तसेच सर्व सामान्य खरेदीदारास ही ठाऊक आहे. असे असताना २८़५० टक्के सवलतीलचा दावा किती हास्यास्पद आहे याची चर्चाच सध्या पालिकेच्या वतुर्ळात सुरू आहे.
    

कोरोना आपत्तीशी लढताना, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाला, हॉस्पिटलला, रूग्णांना कुठलीही कमतरता पडू नये़ याकरिता स्थायी समितीच्या परवानगीशिवाय वैद्यकीय संबंधित गोष्टींची थेट खरेदी करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. यामध्ये पीपीई किट, मास्क, हॅण्डग्लोज, औषधे, हॉस्पिटल उपकरणे, थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर, सॅनिटायझर आदी निगडीत गोंष्टीचा समावेश आहे.
  

 वरील सर्व खरेदी सद्यस्थितीला विना टेंडर केली जात असून, यांच्या खरेदीपश्चात स्थायी समितीकडून ऐनवेळी विषय आणून त्यास मान्यता दिली जात आहे. त्यामुळे कोरोना आपत्तीतील विना टेंडर खरेदी करता देण्यात आलेली ही सुट खाबुगिरीला खतपाणी देणारी ठरली असून, कोरोना आपत्ती काळात खरेदी झालेल्या सर्व वस्तूंची चौकशी व्हावी अशी मागणी आता पुढ येऊ लागली आहे. 
--------------------
 

आरोग्य खात्याकडून होणाऱ्या खरेदींचे ऑडिट व्हावे 
पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सध्या पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर व इतर वैद्यकीय उपकरणांची व तत्सम गोष्टींची विना टेंडर खरेदी केली जात आहे. मात्र बाजार भावापेक्षा दुप्पट तिप्पट किंमत देऊन हे व्यवहार होत असून, कोरोना आपत्ती काळात झालेल्या या सर्व व्यवहारांचे डिट करावे. तसेच या खरेदीसाठी दिलेल्या किंमती व बाजारातील किंमती याची त्रयस्त संस्थेमार्फत चौकशी करून, संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी़ अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 
-------------------
 

पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय थांबवावा - प्रदीप देशमुख
सॅनिटायझरचे अनेक उत्पादक कारखाने पुणे शहर परिसरात जिल्ह्यात असून, पुणे   महापालिका एका मध्यस्थामार्फत सॅनिटायझरची खरेदी करीत आहे. पुणे महापालिकेने ३४ रुपए प्रति १०० मि़ली़ म्हणजेच ३४० रुपए प्रती लिटर व १ हजार ७०० रुपये दर देऊन (५ लिटरचे सॅनिटायझर कॅन) ५ लिटर सॅनिटायझर खरेदी केले आहे. अशा रितीने कोरोना आपत्तीच्या काळात अव्वाच्या सव्वा किंमती देऊन, आरोग्य खात्याकडून होणारी खरेदी म्हणजे पुणेकरांच्या करूरूपाने दिलेल्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली असून, याकरिता योग्य ते आदेश महापालिकेला देण्याबाबत विनंती केली आहे.
--------------------------------------

Web Title: Health department buys sanitizer by more ammount of MRP in the during disaster period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.