आरोग्य विभागाकडून डॉक्टरचा जबाब, पोलिसांना मात्र सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:09 AM2018-03-15T01:09:14+5:302018-03-15T01:09:14+5:30

दवाखान्यात मांत्रिकाला बोलावून उपचार करणारा डॉक्टर पोलिसांना सापडत नसताना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी मात्र त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याचा रीतसर जबाब नोंदवून घेतला आहे.

The health department's doctor's statement, but the police could not find it | आरोग्य विभागाकडून डॉक्टरचा जबाब, पोलिसांना मात्र सापडेना

आरोग्य विभागाकडून डॉक्टरचा जबाब, पोलिसांना मात्र सापडेना

Next

पुणे : दवाखान्यात मांत्रिकाला बोलावून उपचार करणारा डॉक्टर पोलिसांना सापडत नसताना आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी मात्र त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याचा रीतसर जबाब नोंदवून घेतला आहे. पोलीस मात्र त्याला पकडण्यासाठी दोन पथके रवाना केल्याचे सांगत आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाला क्लिनिकमध्येच जबाब देणारा डॉक्टर पोलिसांना मात्र सापडत नाही.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेवर मांत्रिकाकरवी उपचार करून घेणारे डॉक्टर सतीश चव्हाण व मांत्रिकावर अलंकार पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. महापालिकेच्या दोन डॉक्टरांच्या पथकाने डॉक्टर चव्हाण यांच्या क्लिनिकला बुधवारी भेट दिली, त्या वेळी तो क्लिनिकमध्येच होता. त्याचा सविस्तर जबाब पालिकेच्या डॉक्टरांनी नोंदवून घेतला आहे, अशी माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. सोनवणे यांच्यावर उपचार केलेल्या इतर डॉक्टरांकडेही याची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: The health department's doctor's statement, but the police could not find it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.