ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, रोजगार यांची सोय व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:26+5:302020-12-05T04:15:26+5:30
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लॉकडाऊनच्या ग्रामीण अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि रोजगार या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लॉकडाऊनच्या ग्रामीण अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि रोजगार या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले,
कोरोनाने जगाला मागे वळून बघायला शिकवले. जगातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घटकांना नवे मार्ग दिले. देशात आपल्या पूर्वजांनी आहारशास्त्र, योग याबद्दल माहिती सांगितली आहे. त्याची आठवणही करून दिली. कोरोनासारख्या संकटात अनेक नागरिक शहरातून गावात येऊ लागले. त्यावेळी गावे सुरक्षित होती. पण ऑगस्ट महिन्यानंतर कोरोना रुग्ण सापडू लागले.
आपल्याकडे सण, उत्सवाचे योग्य नियोजन केले जात नाही. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. म्हणून उत्साहात सण साजरे केले जातात. पण अशा वेळी ते धोकादायक ठरते. मार्च ते जून कालावधीत आम्ही गावातून योग्य नियोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी तपासणी केली जात होती. तसेच व्हिडिओच्या माध्यमातून खबरदारीच्या सूचनाही दिल्या जात होत्या. जून महिन्यानंतर लोकांनी घाबरणे सोडून दिले. त्यामुळे मध्यंतरी गावकरी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.
संचारबंदीत ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. पण ग्रामीण भागात ते अशक्य झाले होते. घरात एकच मोबाईल, रेंज नाही यामुळे शिक्षणात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. तसेच शालेय अभ्यासक्रमात शेतीविषयक अभ्यासाची भर घातली पाहिजे. शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता, बियाणे, मातीबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तम पिकासाठी मातीची काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वपक्षीय बैठक व्हावी. सर्वांनी चर्चा करून शेतकऱ्यांचे पाणी, माती आणि लँड रेकॉर्डचे प्रश्न सोडवले पाहिजेत.
शेतकऱ्यांसाठी ग्रामसभेतूनच कुठल्याही कायद्यावर मंजुरी मिळवावी. पुढे अडचणी येणार नाहीत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.