Pune | बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणारा आरोग्य निरीक्षक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:52 AM2023-03-28T08:52:39+5:302023-03-28T08:53:38+5:30

लाच मागणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली...

health inspector who demanded a bribe of Rs 30 thousand to avoid transfer was arrested | Pune | बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणारा आरोग्य निरीक्षक अटकेत

Pune | बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणारा आरोग्य निरीक्षक अटकेत

googlenewsNext

पुणे : बिगारी मुकादम म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सचिन धर्मा गवळी (वय ३४) असे या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागात ताे कार्यरत आहे. याप्रकरणी एका ५५ वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार दिली. तक्रारदार हे बिगारी मुकादम म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वडगाव शेरी येथील कार्यालयात काम करतात. त्यांना आरोग्याच्या समस्या असल्याने बदली करू नये, अशी विनंती केली.

तेव्हा गवळी याने ३० हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सचिन गवळी याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: health inspector who demanded a bribe of Rs 30 thousand to avoid transfer was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.