आळेफाटा, राजुरी ,बेल्हे, ओतूर गावांतील आरोग्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:14+5:302021-01-24T04:05:14+5:30
राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा ...
राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही. यासंदर्भात ग्रामसभेत तक्रार अर्ज करणाऱ्यांना धमकावले जात आहे .असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.पुणे नाशिक महामार्गावर समर्थ रेसिडेन्सी इमारतीमधील 70 ते 75 सदनिकातील शौचालय व सांडपाण्यामुळे भरवस्तीत दूषित पाण्याचे तलाव साचले आहेत. राजूर येथील मातंगवस्ती व मुस्लीम दफनभूमी ओढ्यामध्ये गावातील घनकचरा टाकण्यात येत आहे. घनकचऱ्याचे स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात आला होता. ग्रामस्थांनी मागणीस पदाधिकारी व ग्रामविकास आधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. ओतूर येथील शासकीय आरोग्य केंद्र तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. लोकभारती पक्षाचे जुन्नर तालुकाध्यक्ष जालीदभाई पटेल, महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, शाहु फुले-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास पवार, उपाध्यक्ष शौकत शेख, शरद बोराडे, वीशाल गडगे , कमलताई माळवे,वंदना माळवे,कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आरोग्याचा प्रश्नासंदर्भात येथे लोकभारती पक्ष,आझाद हिंद प्रतिष्ठान, शाहू फुले आंबेडकर सामाजिक विकास परिषद, सामाजिक संघटनाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी कार्यकर्ते.