आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचावी
By admin | Published: June 16, 2016 04:00 AM2016-06-16T04:00:52+5:302016-06-16T04:00:52+5:30
एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा
पुणे : एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा देश गुलाम झाला, म्हणूनच आपण जे ज्ञान मिळविले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यसेवा एका विशिष्ठ वर्गापुरती मर्यादित राहिली तर सुदृढ भारताची संकल्पना साकारणे शक्य नाही, याकडे लक्ष वेधले.
गॅलँक्सी केअर हॉस्पीटलच्या उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे तसेच केअर हॉस्पीटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संंचालक डॉ. बी. सोमा राजू, उपाध्यक्ष डॉ. एन कृष्णा रेड्डी आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘आज हेल्थकेअरचा लँंडस्केप बदलतोय, पूर्वी डॉक्टरांची वानवा होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञानावर आधारित हेल्थकेअर सर्वत्र पहायला मिळत आहे. थ्रीडी इमेजनरी आॅपरेशन्स, रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्यसेवा ही सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. शासनाने विम्यावर आधारित महात्मा फुले जन आरोग्य सेवा आणली आहे.
डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘‘२००५ मध्ये हे गॅलेक्सी हॉस्पीटल सुरू केले. लॅप्रॉस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करणारे तंत्र विकसित केले ज्या तंत्राला पुण्याचे नाव दिले गेले. जगभरात ‘पुणे टेक्निक’ या नावाने ते ओळखले जाते. बारा ते तेरा डॉक्टरांना ते शिकविले गेले आहे, ज्याचा विविध देशांमध्ये वापर केला जात आहे. रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणारे हे देशातील पहिले रूग्णालय आहे.’’
पूर्वी विद्यार्थ्याला ६० ते ७० टक्के गुण पडले तरी पेढे वाटले जायचे, आज मात्र मार्कांचे अवमूल्यन किती व्हावे याला देखील मर्यादा असल्या पाहिजेत. कुठेतरी चुकतयं. ८० टक्याची मुलगी आत्महत्या करीत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणपद्धतीत बदल व्हायला पाहिजे.
- डॉ. शां. ब. मुजुमदार