आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:28 PM2021-03-18T20:28:05+5:302021-03-18T20:29:35+5:30

संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण होण्याचे आवाहन

Health Speaker Pramod Kakade contracted corona | आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना कोरोनाची लागण

आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना नियंत्रणासाठी होते वर्षभर कार्यरत

पुणे: गेल्या वर्षाभरापासून कोरोना नियंत्रण आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या बैठका, ग्रामीण भागातील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हॉस्पिटलचे नियोजन करणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि त्यांच्या पत्नी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सध्या ते पुण्यातच गृहविलगीकरण होत आहेत. काकडे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण होण्याचे आवाहन केले आहे. गेले वर्षभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी काकडे यांनी सर्व तालुक्यांमध्ये जाऊन बैठका घेतल्या. कोव्हिड केअर सेंटर्स सुरू केली. तसेच कोव्हिड हॉस्पिटल आणि विप्रो हॉस्पिटल सुरु वरून कोरोना रुग्णांना उपचार आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल वर्षभरानंतर काकडे यांना अखेर कोरोनाने गाठले.

मला कुठलाही त्रास नसून टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने सध्या आपण गृह विलगीकरणात आहे. असे काकडे यांनी सांगितले.
 

Web Title: Health Speaker Pramod Kakade contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.