२८ लाख नागरिकांपर्यंत पोहचली आरोग्य यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:56+5:302021-03-09T04:14:56+5:30

पुणे : कोरोना आपत्तीचा प्रभाव वाढल्यामुळे २४ एप्रिलपासून शहरात कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध अधिक जोमाने सुरू झाला़ ...

The health system has reached 28 lakh citizens | २८ लाख नागरिकांपर्यंत पोहचली आरोग्य यंत्रणा

२८ लाख नागरिकांपर्यंत पोहचली आरोग्य यंत्रणा

googlenewsNext

पुणे : कोरोना आपत्तीचा प्रभाव वाढल्यामुळे २४ एप्रिलपासून शहरात कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध अधिक जोमाने सुरू झाला़ यामध्ये हाय रिक्स व लो रिक्स अशा २८ लाख २२ हजार २११ जणांपर्यंत पोहचून त्यांची आरोग्याची माहिती घेण्यात आली़

महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या या तपासणीत कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे असलेल्या हजारो व्यक्तींना लागलीच जवळच्या रूग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले़ यामुळे वेळीच कोरोनाबाधित असलेल्या इतर व्यक्तींना इतरांपासून विलग करण्यात आले़

महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ़वैषाली जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल, २०२० पासून ७ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत २ लाख ८ हजार ३३० कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोहचली़ यात हाय रिक्स असलेल्या ७ लाख ५ हजार ६९८ व्यक्तींची तर लो रिक्स असलेल्या २१ लाख १६ हजार ५१३ व्यक्तींपैकी कोरोनाशी संबंधित लक्षणे असलेल्यांना कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले़

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभाग व शिक्षण मंडळांच्या सेवकांच्या १ हजार ८४ टिम तयार करून शहरातील घरोघरी जाऊन १६ सप्टेंबरपर्यंत १३ लाख २१ हजार ६२८ घरांना भेटी देऊन ९ हजार ६९९ संशयित व्यक्तींना मनपा/खाजगी रूगणालयात संदर्भित करण्यात आले़ तसेच यात ३ हजार ५७९ कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांना वेळीच इतरांपासून विलग करण्यात आले होते़ आजमितीला पंधरा क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातून १९१ सेवक ९२ तपासणी टीमच्या माध्यमातून कार्यरत आहेत़

---------------------------

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम

माझे कुटुं-माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत शहरातील ३२ लाख ५ हजार ५३७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली़ यातून उजेडात न आलेले १ हजार ६०६ कोरोनाबाधित इतरांपासून विलग करण्यात आले़ तर १ लाख ७८ हजार ७८२ व्याधीग्रस्तांची माहिती घेऊन ९ हजार ९९ जणांना रूग्णालयात पाठविण्यात आले़

---------------------------------------

Web Title: The health system has reached 28 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.