स्मार्ट सिटी पेक्षा आरोग्यदायी शहर महत्त्वाचे : वंदना चव्हाण.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:10 PM2018-04-07T17:10:58+5:302018-04-07T17:12:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन भारती विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते.
पुणे : शहर स्मार्ट होण्यापेक्षा हेल्दी होणे आवश्यक आहे, नागरी आरोग्यावरच शहराचे आरोग्य अवलंबून आहे. त्यासाठी प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी स्वतःसाठी तासभर वेळ दिला पाहिजे. स्मार्ट सिटी पेक्षा आरोग्यदायी शहर महत्त्वाचे आहे. स्मार्टनेस कोणातही येतो , स्मार्टनेस आपोआपच येतो स्वत: च्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन भारती विद्यापीठ येथे करण्यात आले होते. वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पा रेणुसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , नगरसेवक युवराज बेलदरे आदी उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रामध्ये माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट रक्तदान शिबीर, वृक्षसंवर्धन,वृक्षारोपण, आदर्श माता पुरस्कार, मोफत ग्रंथालय,पाणपोई असे विविध उपक्रम राबवित असते. याचाच भाग म्हणून जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल निलीमा पारवडे , छाया त्यागी , रेखा महाडिक , सुरेखा निवंगुणे , सुजाता धुमाळ , नंदा वानखेडे , किरण रायबोले आदींचाही सत्कार करण्यात आला. तसेच भुमिका पुंडे , संस्कार चौधरी व विद्या राठोड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बालाजी कल्याणे , डॉ. अभिजित गायकवाड , डॉ. संजय चव्हाण , डॉ. शितल गोगावले , डॉ. अमित कुलकर्णी यांचे या आरोग्य शिबीरासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश माने यांनी केले. आभार संतोष फरांदे यांनी व्यक्त केले.