कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकस आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:27+5:302021-05-19T04:11:27+5:30
पुणे : पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकस आहार देण्यासह दैनंदिन जेवण आणि नाष्ट्याच्या वेळा कटाक्षाने पाळण्यात येत असून ...
पुणे : पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकस आहार देण्यासह दैनंदिन जेवण आणि नाष्ट्याच्या वेळा कटाक्षाने पाळण्यात येत असून रुग्णांकडून जेवणाबाबत तक्रारी येऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाच्या वेळा पाळल्या जातात की नाही याबाबत उपचार घेतलेल्या रुग्णांनी जेवणाबाबतचे अनुभव चांगले असल्याचे ''लोकमत''ला सांगितले.
कोविड केअर सेंटरमध्ये जेवण मिळत असले तरी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत का याची चाचपणी करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये प्रशासनालाही अनुभव नसल्याने व्यवस्था उभी करण्यात अडचणी येत होत्या. अनेक त्रुटी आरडाओरडा झाल्यावर दूर करण्यात आल्या. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाला कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल उभारण्यासोबतच आरोग्य व्यवस्था, जेवण आदींची व्यवस्था उभी करण्याचा अनुभव असल्याने यावेळी या यंत्रणेत फारशी अडचण आली नाही.
पालिकेची आजमितीस सात कोविड केअर सेंटर सुरू आहेत. या सेंटरची क्षमता २ हजार ३६० बेडची आहे. सद्यःस्थितीत ५८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, जम्बो, लायगुडे, बाणेर कोविड सेंटर, दळवी रुग्णालय आदी आयात रुग्णालये आहेत. याठिकाणी रुग्णांना सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, दुपारचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण दिले जाते. या जेवणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी वारंवार तपासणी केली जात आहे. रुग्णांनी जेवणाबाबत आणि जेवणाच्या वेळा पाळल्या जाण्याबाबत समाधान व्यक्त केले.
--///--
कार्यान्वित कोविड केअर सेंटर - ७
या सेंटर्समध्ये सध्या दाखल रूग्ण - ५८५
सरकारी कोविड हॉस्पिटल - ८
दाखल रुग्ण - ४,५००
चार सेंटरचे चार बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये नाष्टा, जेवण कधी मिळते आणि कसे मिळते, याचा आढावा घ्यावा.
अ) जम्बो कोविड सेंटर :
चहा-नाष्टा : सकाळी ७.३० वाजता
(पोहे-उपीट आदी, सोबत अंडी)
जेवण : दुपारी १२.३० ते ०१.००
चहा-नाश्ता : दुपारी ०४.०० वाजता
(चहा-बिस्कीट, सूप, प्रोटीनयुक्त डाएट फूड, व्हेजिटेबल सूप, अंडी)
जेवण : रात्री ७.३० ते ०८.००
-----
ब) बाणेर कोविड सेंटर :
चहा-नाष्टा : सकाळी ७.३० वाजता
(पोहे-उपीट आदी, सोबत अंडी)
जेवण :दुपारी १२.३० ते ०१.००
चहा-नाष्टा : दुपारी ०४.०० वाजता
(चहा-बिस्कीट, सूप, प्रोटिनयुक्त डाएट फूड, व्हेजिटेबल सूप, अंडी)
जेवण : रात्री ७.३० ते ०८.००
क) दळवी रुग्णालय शिवाजीनगर :
चहा-नाष्टा : सकाळी ७.३० वाजता
(पोहे-उपीट आदी, सोबत अंडी)
जेवण :दुपारी १२.३० ते ०१.००
चहा-नाष्टा : दुपारी ०४.०० वाजता
(चहा-बिस्कीट, सूप, प्रोटिनयुक्त डाएट फूड, व्हेजिटेबल सूप, अंडी)
जेवण : रात्री ७.३० ते ०८.००
ड) डॉ. नायडू रुग्णालय :
चहा-नाष्टा : सकाळी ७.३० वाजता
(पोहे-उपिट आदी, सोबत अंडी)
जेवण :दुपारी १२.३० ते ०१.००
चहा-नाष्टा : दुपारी ०४.०० वाजता
(चहा-बिस्कीट, सूप, प्रोटिनयुक्त डाएट फूड, व्हेजिटेबल सूप, अंडी)
जेवण : रात्री ७.३० ते ०८.००
३) पालिकेने कोविड सेंटरनिहाय जेवणाचे कंत्राट दिलेले आहे. जेवणाचे दरही ठरवून देण्यात आलेले आहेत. या जेवणामध्ये पोळ्या-भाजी, भात आणि आमटी यासोबतच अंडी, सकस आहार देण्याबाबत पालिका प्रशासन आग्रही असते. या जेवणाची तपासणीदेखील करण्यात येते.
----
पालिकेच्या कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये जेवणाचा दर्जा राखण्यासोबतच जेवण आणि नाष्ट्याच्या वेळा पाळल्या जातील याची खबरदारी घेतली जाते. रुग्णांना सकस आहार देण्यावर अधिक भर आहे. पोळी-भाजी-भात-आमटी यासोबतच अंडी, व्हेजिटेबल सूप, डाएट फूड देण्याची दक्षता घेतली जाते.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग
----